Rashibhavishya: शनिवार, १२ ऑक्टोबर २०२४. अश्विन शुक्ल नवमी/दशमी.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
“आज शुभ दिवस आहे” विजयादशमी (दसरा) नवरात्रोथापण पारणे.
नक्षत्र: श्रवण (चंद्र). आज जन्मलेल्या बाळाची राशी- मकर. (धृती योग)
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) मन प्रसन्न राहील. चविष्ट भोजन मिळेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. आर्थिक चिंता मिटतील. प्रलोभने कटाक्षाने टाळा.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) अत्यन्त दिवस आहे. कुटुंबासाठी खरेदी होईल. संतती बाबत खुश खबर मिळेल. प्रिय व्यक्ती साठी वेळ द्याल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) संमिश्र दिवस आहे. अष्टम स्थानी चंद्र आहे. अर्थकारण सुधारेल. मात्र अनामिक भय दाटून येईल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) दिवस अनुकूल आहे. मनासारखी कामे पार पडतील. प्रवास घडतील. पशु पासून त्रास संभवतो.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) आर्थिक लाभ वाढतील. सरकारी कामात यश मिळेल. नवीन संधी चालून येतील. खुशखबर मिळेल.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) संमिश्र दिवस आहे. पंचम स्थानी चंद्र आहे. कामाचा पसारा वाढेल. आर्थिक लाभ होतील. बोलताना काळजी घ्या.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) आर्थिक दृष्टीने संमिश्र दिवस आहे. चतुर्थ स्थानी चंद्र आहे. सौख्य लाभेल. कठोर मेहनत केल्यास उत्तम लाभ होतील.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) सामजिक कार्यात यश मिळेल. कनिष्ठ व्यक्तीची साथ लाभेल. स्पर्धेत विजयी व्हाल. नीतिमत्ता सांभाळा.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) नोकरी/ व्यवसायात अनुकूलता वाढेल. आर्थिक लाभ होतील. सौख्य लाभेल. गुंतवणूक वाढेल. कलाकारांना खुश खबर मिळेल.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) तुमच्याच राशीत चंद्र आहे. अनुकूल आणि उत्साही दिवस आहे. स्वप्ने पूर्ण होतील. शेतीतून लाभ होतील. वाहन सौख्य लाभेल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) संमिश्र दिवस आहे. व्यय स्थानी चंद्र आहे. खर्च वाढतील. मनस्ताप होऊ शकतो. आरोग्य सांभाळा.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) व्यवसायातून लाभ होतील. मनासारखी कामे होतील. आर्थिक नियोजन करा. मित्रांकडून सहकार्य मिळेल.
कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन,
‘ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521