36 तासांनंतर बेपत्ता श्रीनिवास वनगा घरी परतले

IMG 20241030 132401

36 तासांनंतर बेपत्ता श्रीनिवास वनगा सुखरूप, घरी परतलेपालघर: तब्बल 36 तासांपासून नॉट रिचेबल असलेले श्रीनिवास वनगा अखेर घरी सुखरूप परतले आहेत. सोमवारी संध्याकाळपासून संपर्कात नसलेले वनगा काल रात्री 3 वाजता घरी आले. त्यांच्या घरी परतल्यानंतर श्रीनिवास वनगांच्या प्रकृतीत काही अस्वस्थता असल्याचे समजते, आणि सध्या ते विश्रांती घेत असल्याची माहिती त्यांच्या पत्नी सुमन वनगांनी दिली आहे.वनगा यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे गटाकडून पालघर विधानसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने ते काहीसे दुखावले होते. या निराशेतून त्यांनी काही कठोर विचारही केले होते, असे सुमन वनगांनी सांगितले.या घटनेनंतर शिंदे गटाच्या नेतृत्वाने तातडीने वनगा कुटुंबाशी संपर्क साधला होता. सध्या वनगा यांच्या प्रकृतीला पूर्ण विश्रांतीची आवश्यकता आहे, असे सांगण्यात आले आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.