Nashik : ८ वर्षांपासून फरार आरोपीला अटक: नाशिक गुन्हे शाखा युनिट-२ची कामगिरी

IMG 20241202 WA0008

Nashik : अंबड पोलीस ठाण्यात २०१८ पासून दाखल गंभीर गुन्ह्यातील मुख्य आरोपी दीपक जामराव पाटील (वय ४८, रा. पिराचे बोरखेडे, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) याला अखेर नाशिक गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाने शिताफीने अटक केली. तब्बल ८ वर्षांपासून फरार असलेल्या या आरोपीला पकडून न्यायालयासमोर उभे करण्याचा पोलीस दलाचा प्रयत्न अखेर यशस्वी ठरला. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार ही महत्वाची कामगिरी पार पडली.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ०४/२०१८ नोंदवण्यात आला होता. भारतीय दंड विधान कलम ४२० (फसवणूक), ४६५ (खोटा दस्तावेज तयार करणे), ४६८ (फसवणूक करण्याच्या उद्देशाने खोटा दस्तावेज तयार करणे), ३८१ (चोरी), ४११ (चोरीचा माल हाताळणे), आणि ३४ (सामूहिक हेतू) अंतर्गत गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी दीपक पाटील याने गुन्हा करून फरार होता.

गुन्हे शाखा युनिट-२चे पोलीस हवालदार मनोहर शिंदे यांना दीपक पाटील नाशिकमधील विकास लॉज, दुध बाजार भद्रकाली येथे वास्तव्यास असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले.

सहायक पोलीस निरीक्षक समाधान हिरे, पोउनि यशवंत बेंडकुळे, पोहवा सुनिल आहेर, मनोहर शिंदे, प्रकाश महाजन, पोलीस अंमलदार महेश खांडबहाले, आणि तेजस मते यांनी तातडीने आरोपीचा पाठलाग केला. अत्यंत शिताफीने आरोपीला अटक करून पुढील तपासासाठी अंबड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.

गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाने ही कामगिरी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपआयुक्त प्रशांत बच्छाव, आणि सहायक आयुक्त संदीप मिटके यांनी गंभीर गुन्ह्यातील फरारी आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याच्या सूचना दिल्या होत्या.

हे पण वाचा : Nashik : १०६ तोतया वारसदारांच्या मदतीने २ कोटींचा आर्थिक घोटाळा”