नाशिकमध्ये सावकारी जाचामुळे आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप; मुख्य आरोपी वैभव देवरेला पुण्यातून अटक

WhatsApp Image 2024 10 26 at 14.04.21 36df4d7c

नाशिक – सावकारी जाचाला कंटाळून आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि जिवे ठार मारण्याचा कट रचल्याच्या आरोपाखाली सराईत सावकारी गुन्हेगार वैभव देवरेला नाशिक पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाने पुण्यातून अटक केली आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

२० ऑक्टोबर रोजी गंगापूर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार, गितांजली धिरज पवार यांनी वैभव देवरे, सोनल देवरे, आणि निखील पवार यांच्याविरुद्ध गंभीर आरोप केले होते. आरोपी क्रमांक ०२ आणि ०३ यांना आधीच अटक करण्यात आली होती, तर मुख्य आरोपी वैभव देवरे फरार होता.

पोलिस आयुक्त संदीप कर्णीक, उप आयुक्त प्रशांत बच्छाव, आणि सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या आदेशानुसार गुंडा विरोधी पथकाच्या प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या विशेष मोहीम राबवण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारे पुणे येथे आरोपीच्या हालचालींचा मागोवा घेण्यात आला. सलग चार दिवस वेषांतर करून तपास करत, पिंपरी चिंचवड येथील पिंपळे गुरव परिसरात वैभव देवरेला शिताफिने अटक करण्यात आली.

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुद्गल यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते आणि त्यांच्या टीमने यशस्वीरीत्या पार पाडली. आरोपीला पुढील तपासासाठी नाशिकच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आले आहे.