Aries Daily Horoscope : १ एप्रिल रोजी जन्मलेल्या व्यक्तींवर रवि आणि मंगळ या ग्रहांचा प्रभाव असतो. अशा व्यक्ती स्वतंत्र विचारांच्या, धाडसी, आत्मनिर्भर, आणि तर्कशुद्ध विचारसरणीच्या असतात. सतत नवीन संधी शोधणे, कामात मग्न राहणे आणि वक्तृत्वकौशल्य हे त्यांचे विशेष गुण आहेत. अशा व्यक्ती कलाप्रिय असतात आणि व्यावसायिक तसेच वैयक्तिक जीवनात नेहमीच नाविन्यतेचा शोध घेतात.
व्यवसाय, शुभ दिवस आणि रत्ने: (Aries Daily Horoscope)
- अनुकूल व्यवसाय: सैनिक, राजकारण, डॉक्टर, इंजिनीयर, बांधकाम, लोखंडाचे काम.
- शुभ दिवस: रविवार, सोमवार, गुरुवार
- शुभ रंग: सोनेरी, नारंगी, जांभळा, पिवळा
- शुभ रत्ने: माणिक, पाचू (रत्ने घेताना कुंडलीचा आधार घ्यावा)
आजचे राशिभविष्य (१ एप्रिल २०२५) – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Aries Daily Horoscope)
मेष राशी (Aries):
तुमच्याच राशीत चंद्र असल्यामुळे अनुकूल दिवस आहे. महत्वाची कामे आज पूर्ण करा. दुपारनंतर अनुकूलता वाढेल. संपत्ती वाढेल, कर्ज मंजूर होतील, आणि खर्च योग्य कारणासाठी होईल.
वृषभ राशी (Taurus):
सकाळी व्यय स्थानी चंद्र आहे, मात्र काळजी नको. दुपारनंतर सहा ग्रहांचा अनुकूल परिणाम मिळेल. स्वप्ने साकार होतील, भरभराट होईल, आणि गूढ गोष्टींचा उलगडा होईल.
मिथुन राशी (Gemini):
कामाच्या ठिकाणी चांगले अनुभव येतील. चैनीवर खर्च कराल. दीर्घकालीन परिणाम करणाऱ्या घटना घडतील.
कर्क राशी (Cancer):
चंद्र अनुकूल आहे. नवम स्थानी ग्रहांची सभा आहे. प्रगती होईल, लक्ष्मी प्रसन्न होईल, मन आनंदी राहील. प्रवासाचे नियोजन होईल.
सिंह राशी (Leo):
दूरचे प्रवासाचे नियोजन कराल. आध्यात्मिक उंची वाढेल. सरकार दरबारी मान्यता मिळेल. एखादी अप्रिय बातमी कानी पडू शकते.
कन्या राशी (Virgo):
संमिश्र दिवस आहे. आर्थिक प्रगती बऱ्यापैकी होईल. भागीदारी व्यवसायात यश मिळेल. विवाह इच्छुकांना चांगली बातमी मिळेल.
तुळ राशी (Libra):
अनुकूल दिवस आहे. प्रेमात यश लाभेल. मन प्रसन्न राहील. आर्थिक प्रगती होईल. आनंदाची झुळूक अनुभवाल.
वृश्चिक राशी (Scorpio):
छान दिवस आहे. ग्रहमानाचा आनंद घ्याल. दूरचे प्रवास घडतील. गुंतवणुकीतून लाभ होतील.
धनु राशी (Sagittarius):
महत्वाचे निर्णय घ्यावेत. आर्थिक प्रगती होईल. करार होतील. व्यवसायात वाढ होईल.
मकर राशी (Capricorn):
कौटुंबिक कामात वेळ जाईल. स्वप्ने साकार होतील. सामाजिक कार्य कराल. नात्यातून लाभ होतील.
कुंभ राशी (Aquarius):
उद्योग/व्यवसायात उत्तम प्रगती होईल. आर्थिक भरभराट होईल. कलाकारांना उत्तम दिवस आहे.
मीन राशी (Pisces):
बौद्धिक प्रांतात मुशाफिरी कराल. मन प्रसन्न राहील. प्रिय व्यक्तीची भेट होईल. व्यवसाय वाढेल.
ज्योतिष सल्ला आणि कुंडली विश्लेषणासाठी संपर्क करा:
- ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
- 8087520521
“राशीभाव” फेसबुक पेजला भेट द्या!
कुंडली, करियर, विवाह, व्यवसाय, आरोग्य, शुभ रत्ने आणि इतर मार्गदर्शन मिळवा. आपल्या राशीचे संपूर्ण मार्गदर्शन जाणून घ्या!