Baba Siddiqui : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा कट: तीन आरोपींचा जेलमध्ये आखलेला कट आणि बिष्णोई गँगशी संबंध उघड

baba-siddiqui-murder-case-arrests-mumbai

Latest News : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा कट अत्यंत नियोजनपूर्वक शिजवला गेला होता, ज्याची सुरुवात सप्टेंबर महिन्यात झाली होती. या कटाच्या मुख्य सूत्रधारांनी कुर्त्या येथे भाड्याने खोली घेऊन राहायला सुरुवात केली होती. त्यांनी घेतलेल्या खोलीचे भाडे महिन्याला 14 हजार रुपये होते. हत्या प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी ही खोली वापरली.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

या हत्येच्या कटामागे तीन आरोपी होते, जे आधी पंजाबमधील एका जेलमध्ये एकत्र आले होते. जेलमध्ये असताना ते एकमेकांच्या संपर्कात आले आणि त्यांनी कुख्यात बिष्णोई गँगच्या सदस्याच्या माध्यमातून संपर्क वाढवला. बिष्णोई गँगचे नाव या गुन्हेगारी कारवायांमध्ये आधीपासूनच आलेले होते, आणि त्यामुळेच आरोपींनी गँगच्या सदस्याकडून सूचना मिळत होत्या.

जेलमध्ये असताना आरोपींनी सिद्दीकी यांच्या आत्याचा कट शिजला होता. त्यांनी हत्येसाठी सुपारी घेतली होती, ज्यासाठी त्यांना प्रत्येकी 50 हजार रुपये मिळणार होते. हत्या झाल्यानंतर हे पैसे आरोपींमध्ये वाटले जाणार होते . सुपारीचे पैसे मिळवण्यासाठी त्यांनी अत्यंत गुप्तपणे आणि नियोजनपूर्वक सर्व गोष्टींना अंमलात आणले.

आरोपींनी सप्टेंबरपासूनच आत्याचा कट रचला होता . कुर्त्यातील कुली त्यांनी भाड्याने घेतली होती व त्यासाठी ते महिन्याला 14 हजार रुपये देत होते .

या प्रकरणातील तपासादरम्यान पोलिसांनी आरोपींचे जेलमधील कनेक्शन आणि बिष्णोई गँगसोबतचा संपर्क शोधून काढला. हे आरोपी जेलमध्ये असतानाच एकमेकांच्या जवळ आले आणि त्याच काळात त्यांनी सिद्दीकी यांच्या हत्येचा कट आखला होता.

Leave a Reply