माझी लाडकी बहीण योजनेत लाभाच्या रकमेवर बँकांचे शुल्क, मंत्री आदिती तटकरे यांनी दिले कारवाईचे निर्देश

Banks Deducting Fees from Beneficiaries of "Majhi Ladki Bai" Scheme; Minister Aditi Tatkare Orders Action

*महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींना दिल्या जाणाऱ्या रकमेवर काही बँका मिनिमम बॅलन्स, ईसीएस मँडेट रिटर्न, चेक रिटर्न यासारखी शुल्क आकारत आहेत. यामुळे लाभार्थी महिलांच्या खात्यांतील रक्कम कपात करण्यात येत आहे. अशा बँकांवर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

आज मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय आढावा बैठकीत या मुद्द्याचा तपशीलवार आढावा घेण्यात आला. बैठकीत महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव, एकात्मिक बालविकास योजनेचे आयुक्त कैलास पगारे, तसेच सर्व जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकारी उपस्थित होते.बैठकीत काही पात्र महिलांना आधार सिडींग नसल्यामुळे लाभ मिळत नसल्याचे निदर्शनास आले.

मंत्री तटकरे यांनी २ ते ७ ऑक्टोबर दरम्यान अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मदतीने आधार सिडींगसाठी विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले. तसेच बँकांशी संबंधित अडचणींच्या सोडवणुकीसाठी स्थानिक पातळीवर बैठका घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

नांदेड जिल्ह्यात झालेल्या फसवणुकीच्या प्रकारावरही बैठकीत चर्चा झाली. पुरुषांचे आधार क्रमांक व अकाउंट नंबर वापरून अर्ज भरले गेल्यामुळे पुरुषांच्या खात्यात पैसे जमा झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आणि संबंधित केंद्र चालकाविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश मंत्री तटकरे यांनी दिले.आतापर्यंत २ कोटी ४० लाख महिलांची नोंदणी झाल्याचे समोर आले आहे, त्यापैकी १ कोटी ८७ लाख महिलांना लाभ दिला गेला आहे. उर्वरित अर्जांची तातडीने पडताळणी करून महिलांना लाभ देण्याचे आदेशही मंत्री तटकरे यांनी दिले.

Leave a Reply