विकी कौशलच्या ‘छावा’चा धमाका – 2025 चा पहिला ब्लॉकबस्टर ठरणार?
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
Chhava movie : विकी कौशलचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘छावा’(chhava) व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळवत आहे. पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे पाहता, हा चित्रपट 2025 चा पहिला ब्लॉकबस्टर ठरण्याची शक्यता आहे.
पहिल्या दिवशीच ‘छावा’ची (Chhava) दमदार कमाई!
सिनेमागृहांमध्ये प्रेक्षकांची मोठी गर्दी दिसून येत आहे, आणि बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने पहिल्याच दिवशी 12.51 कोटी रुपयांची कमाई केली आहे. सैक्निल्कच्या रिपोर्टनुसार, सायंकाळी 5.15 मिनिटांपर्यंत हे आकडे समोर आले असून, अंतिम आकडे आणखी वाढू शकतात.
‘छावा’ने (Chhava) मोडले 7 चित्रपटांचे रेकॉर्ड!
यंदाच्या वर्षी बॉलिवूडमधील अनेक मोठे चित्रपट फ्लॉप ठरले, मात्र ‘छावा’ने पहिल्याच दिवशी खालील चित्रपटांना मागे टाकले –
- ‘इमर्जन्सी’ – 2.5 कोटी
- ‘आझाद’ – 1.5 कोटी
- ‘स्काय फोर्स’ – 12.25 कोटी
- ‘देवा’ – 5.5 कोटी
- ‘लवायपा’ – 1.25 कोटी
- ‘बदास रविकुमार’ – 2.75 कोटी
- ‘थंडेल’ – 11.5 कोटी
‘छावा’च्या अॅडव्हान्स बुकिंगला मोठा प्रतिसाद!
चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच ‘छावा’ने अॅडव्हान्स बुकिंगमधून 17.89 कोटी रुपयांची कमाई केली होती. यावरून स्पष्ट होते की, प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता होती आणि आता तो बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई करणार आहे.
‘छावा’ (Chhava) बॉक्स ऑफिसवर कोणते विक्रम मोडणार?
- पहिल्या आठवड्यात 100 कोटींचा टप्पा गाठणार?
- विकी कौशलच्या कारकिर्दीतील सर्वात मोठी हिट ठरणार?
- 2025 मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनणार?
याची उत्तरं पुढील काही दिवसांत मिळणार आहेत. तुम्ही ‘छावा’ पाहिला का? तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा!