Complaint Against Farah Khan for Controversial Holi : फराह खानच्या होळीवरील वादग्रस्त वक्तव्यावर हिंदुस्तानी भाऊची तक्रार

Farah Khan

फराह खानच्या (Farah Khan) वक्तव्यावर हिंदू समुदायाची नाराजी

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

Farah Khan : बॉलिवूडची प्रसिद्ध दिग्दर्शक आणि कोरिओग्राफर फराह खान (Farah Khan) वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. तिने हिंदू धर्माचा पवित्र सण असलेल्या होळी विषयी अपमानास्पद टिप्पणी केल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणावरून प्रसिद्ध युट्यूबर आणि सामाजिक कार्यकर्ता हिंदुस्तानी भाऊ उर्फ विकास पाठकने तिच्या विरोधात कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.

https://twitter.com/hindupost/status/1892444759098347808?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1892444759098347808%7Ctwgr%5E0aeb1a0106ca4ba0acc7198cd5c678e0ffbab0bc%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fd-12451440982696695985.ampproject.net%2F2502032353000%2Fframe.html

काय आहे संपूर्ण प्रकरण?

ताज्या रिपोर्ट्सनुसार, २० फेब्रुवारी रोजी प्रसारित झालेल्या ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ या शोमध्ये फराह खान (Farah Khan) परीक्षक म्हणून सहभागी झाली होती. शो दरम्यान, तिने “छपरी लोकांचा का सण” असे वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे हिंदू धर्माच्या अनुयायांमध्ये नाराजी पसरली आहे. फराहच्या या विधानानंतर हिंदुस्तानी भाऊने आपल्या वकील अली आशिफ खान देशमुख यांच्यामार्फत खार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

हिंदुस्तानी भाऊने काय म्हटले?

हिंदुस्तानी भाऊने आपल्या तक्रारीत असा दावा केला आहे की, “फराह खानच्या (Farah Khan) वक्तव्यामुळे माझ्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. इतकेच नव्हे तर मोठ्या प्रमाणावर हिंदू समुदायाच्या भावनांनाही ठेच पोहोचली आहे.” त्याने हीही मागणी केली आहे की, फराह खानविरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी.

वकील अली आशिफ खान देशमुख यांचे मत

हिंदुस्तानी भाऊचे वकील अली आशिफ खान देशमुख यांनी सांगितले की, “माझ्या क्लायंटचे एकच म्हणणे आहे की फराह खानने होळी या पवित्र सणाविषयी ‘छपरी’ हा शब्द वापरला आहे. हा शब्द अत्यंत आक्षेपार्ह असून, जातीय तणाव निर्माण करू शकतो. त्यामुळे तिच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई व्हावी.”

फराह खानविरोधात कोणती कारवाई होऊ शकते?

फराह खान विरोधात विविध कलमांखाली तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली असून, लवकरच पुढील कारवाई केली जाणार आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे सोशल मीडियावरही संताप व्यक्त केला जात आहे.