राशिफल ज्योतिष्य:
सौ मधुरा मंगेश पंचाक्षरी नाशिक
मोबाईल-9272311600
मंगळवार, 7 जानेवारी 2025. पौष शुक्ल अष्टमी
राहुकाळ – दुपारी 3 ते 4:30
“आज चांगला दिवस आहे. दुर्गाष्टमी, शाकंभरी देवी नवरात्र उत्सव आरंभ
आजचे राशिभविष्य आणि
7 जानेवारी रोजी जन्मलेल्यांमध्ये वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुमच्यावर नेपच्यून आणि शनि या ग्रहांचे वर्चस्व आहे. तुमचे व्यक्तीमत्व मूलतः च स्वतंत्र आहे.दूरच्या प्रवासाची आवड असून काहींना काही निमित्ताने परदेशा शी संबंध येतो.चाकोरीबद्ध आयुष्य पसंत नसते.नेपच्यून ग्रह अध्यात्मिक तत्त्वाचा असल्याने उच्च कोटींचा अहंकार वैयक्तिक रित्या जोपासला जातो. पक्ष्यांकडे प्रमाणे सोयीरवृत्ती आवडते .मोठमोठे भविष्यवाणी अध्यात्मवादी यांच्यावर नेपच्यून ग्रहाचे प्राबल्य असू शकते .तुमची वागणूक बऱ्याच वेळा गुढ असते. काही वेळा दुराग्रही व दुसऱ्यांच्या मताची उपेक्षा केली जाते पैसा मिळवण्याची कला तुम्हाला अवगत आहे .काही वेळा तुम्ही बेफिकीर व उदास वृत्तीचे असता.तुम्ही फक्त चांगल्या गोष्टींची निवड करतात. सर्वसाधारण विचारसरणीच्या किंवा सामान्य माणसात मिसळणे तुम्हाला आवडत नाही. आयुष्यात सतत बदल आवडतो पुस्तक वाचनाची आवड असते .स्वतःचे ज्ञान अधिकार याची जाणीव असते. सल्ला विचारल्यास तुम्ही अधिकाऱ्याने व खंबीरपणाने देता .खात्री झाल्याशिवाय कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवत नाही. स्वतंत्र बाणा असतो .तुमच्या वागण्यातून इतरांना स्फूर्ती मिळते .स्वभाव आनंदी व उत्साही असतो. आयुष्यात सतत बदल होत असल्याने पैशाची बचत करणे कठीण होते .आवडीची नोकरी मिळाल्यास जीवनात चांगला पैसा मिळवून स्थिरता प्राप्त होते .आराम ,सुख सोयी उपलब्ध होतात पण आर्थिक स्थैर्य फार उशिरा मिळते .तुम्ही अतिशय हुशार आहात परंतु तुमचे वागणे अनाकलनीय असते. अतिशय अस्वस्थ असून छोट्या छोट्या गोष्टीवरून चिडत राहता. मित्र मैत्रिणींसोबत मेजवानी करणे आवडते. तुमच्या नवऱ्याने सदैव तुमच्याकडे लक्ष द्यावे अशी अपेक्षा असते खास करून . स्वभावाने नम्र असून एखाद्या गोष्टीचा स्वतःला त्रास करून घ्याल परंतु इतरांवर वाईट परिणाम होऊ देत नाहीत. चांगले पत्नी म्हणून तुमचे कौतुक केले जाते.
शुभ दिवस- सोमवार ,बुधवार गुरुवार
शुभ रंग- हिरवा, पिवळा जांभळा
शुभ रत्न – पुष्कराज पाचू,लसण्या
आजचे राशिभविष्य
मेष:- आज सकाळच्या सत्रात स्पष्ट भूमीका घ्याल. मोह टाळा.वाहन काळजीपूर्वक चालवा.दुपारनंतर पैशाची चिंता मिटेल.मन प्रसन्न राहील.प्रवासाचे योग.
वृषभ:- आज सकाळची सुरवात मस्त, लाभदायक असेल.कामे झटपट उरका.दुपारनंतर दमछाक झाल्याने विश्रांती घ्यावीशी वाटेल.आरोग्य जपा.
मिथुन:- आज वडील आणि वडीलधार्यांकडून लाभ होईल. अर्थ प्राप्ती संभवते. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल. सोशल मीडियावर एखाद्या टिप्पणी चे कौतुक होईल.
कर्क:- आज धार्मिक कार्यक्रमात सहभाग घ्याल.कामाचा उत्साह वाढेल.छान अनुभव येतील. सहलीचे बेत ठरतील.
सिंह:- आज आर्थिक दृष्टीने लाभदायक दिवस आहे. उच्च शिक्षणासाठी परदेशी जाऊ इच्छुकांना चांगला काळ. सहलीचे योग.
कन्या:- आज संमिश्र दिवस.सकाळची सुरवात उत्तम असेल.कामाचा वेग राहील.दुपारनंतर प्रकृतीस त्रास संभवतो. एखाद्या आजारावर अचानकपणे खर्च करावा लागेल. मात्र अचानक प्राप्ती झाल्याने काळजी मिटेल.
तुळ:- आज कौटुंबिक वातावरण चांगले राहील मात्र मोजके बोला.दुपारनंतर मनोरंजनात मन रमेल.कलाकार चमकतिल.पर्यटन घडेल.
वृश्चिक:- आज गुंतवणूक लाभदायक ठरेल.शैक्षणिक यश प्राप्त होईल.प्राण्यांपासून लाभ होईल.दुपारनंतर चा काळ उत्तम.कामे सुकर पार पडतील.शत्रू नामोहरम होतील.
धनु:- आज सर्वसामान्य दिवस आहे. कामे मार्गी लागतील.रेंगाळलेली कामे पूर्ण कराल.आईच्या प्रकृती कडे लक्ष द्यावे लागेल.कौटुंबिक वातावरण शांत राखा.
मकर:- आज घरगूती कामात व्यस्त रहाल.कौटुंबिक खरेदी घडेल.कामानिमित्त प्रवास घडेल.
कुंभ:- आज राग टाळा,कटू बोलणे टाळा.दुपारनंतर हातून लेखन होईल,सृजनशीलता, कल्पना शक्ती दिसून येईल.प्रसिद्धी लाभेल.
मीन:- आज उत्साही दिवस असेल वाहन सौख्याचा .नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी चांगला दिवस.राग आवरा.घरगुती कटकटी टाळा.
सौ मधुरा मंगेश पंचाक्षरी नाशिक
मोबाईल-9272311600
लग्न ,करियर, गुण मीलन विषयी
सशुल्क पत्रिका पाहण्यासाठी संपर्क करावा.