Eknath shinde : मुंबईत उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांना जीवे मारण्याची धमकी देणारा ई-मेल आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या गाडीला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली गेली असून, ही बाब सुरक्षा यंत्रणांसाठी गंभीर चिंता निर्माण करणारी आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
गोरेगाव पोलीस ठाण्यासह मुंबईतील जवळपास 7 ते 8 पोलीस ठाण्यांना आणि इतर काही सरकारी विभागांना ही धमकी मिळाली आहे. मंत्रालय पोलीस ठाणे आणि जेजे मार्ग पोलीस ठाण्यालाही अशीच धमकी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तातडीने कारवाई सुरू केली असून, ई-मेल पाठवणाऱ्याचा शोध घेण्यासाठी सायबर सेल कार्यरत झाले आहे.
या धमकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी उच्चस्तरीय तपास सुरू केला आहे. सायबर क्राइम विभाग आणि गुप्तचर यंत्रणा या प्रकरणाचा तपास करत असून, धमकी देणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी तांत्रिक साधनांचा वापर केला जात आहे. एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे.
या घटनेनंतर महाराष्ट्र सरकारने त्वरित एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचे आदेश दिले आहेत. मुंबईतील पोलिस बंदोबस्त आणखी कडक करण्यात आला असून, विशेष तपास पथक या प्रकरणाचा शोध घेत आहे.
अद्याप धमकी देणाऱ्यांची ओळख पटलेली नसून, पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. या प्रकारामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आगामी काळात या प्रकरणात अधिक माहिती मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
TV 9Marathi Youtub