“नाशिक मध्य: देवयानी फरांदेची विजयाची हॅट्रिक की वसंत गीते यांचे पुनरागमन? (“Nashik Central: Will Devyani Farande Achieve a Hat-trick Victory or Will Vasant Geete Make a Comeback?”)

Devyani Farande VS Vasant gite

नाशिक शहराचा गाभा असलेला नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघ मागच्या दहा वर्षात इथे बीजेपीचा वर्चस्व आहे बीजेपी सलग तिसऱ्यांदा निवडून येते की महाविकास आघाडी येथे विजयाचा धक्का देते नाशिक मध्य मतदारसंघाविषयी थोडक्यात विश्लेषण जाणुन घेऊया.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

कॉलेज रोड महात्मा नगर गंगापूर रोड मुंबई नाका कलेक्टर ऑफिस सीबीएस भद्रकाली दूध बाजार असा संपूर्ण परिसर नाशिक मध्य मतदारसंघात येतो उच्चभ्रू ते अति उच्चभ्रू लोक या मतदारसंघात पाहायला मिळते 2009 ला निर्माण झालेल्या या मतदारसंघावर पहिल्यांदा मनसेच्या वसंत गीतेंनी बाजी मारली होती.त्यांनी सध्याच्या धुळे लोकसभेच्या खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांचा 31 हजार मतांनी पराभव केला होता.

2014 मध्ये नाशिकने भाजपला तीन आमदार दिले त्यात नाशिकमध्ये बीजेपीच्या देवयानी फरांदे यांनी मनसेच्या वसंत गीते यांचा जवळपास 28 हजार मतांनी पराभव केला. त्यावेळेस नाशिकचे प्रतिष्ठित नगरसेवक शाहू खैरे, अजय बोरस्ते, विनायक खैरे यांचाही पराभव देवयानी फरांदे यांनी केला. 2019 लाही नाशिककरांचा कौल बीजेपीच्या पारड्यात पडला आणि नाशिक मध्य सलग दोनदा बीजेपीच्या देवयानी फरांदे यांनी 28000 मतांनी विजय मिळवला त्यांनी काँग्रेसच्या हेमलता पाटलांचा पराभव केला.

नाशिककरांचा कौल एकंदरीत मागच्या तीन विधानसभा निवडणुकांमध्ये पाहायला मिळते 2009 ला तिन्ही मतदारसंघावर मनसेचे तीन आमदार विधानसभेत पाठवले गेले. 2009 ला च मनसेने नाशिक महानगरपालिकेवरही झेंडा फडकवला होता. तेव्हा राज ठाकरे यांचा बराचसा प्रभाव नाशिककरांवर होता.

पुढे मग 2014 आणि 2019 ला देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकला दत्तक घेतो म्हणून तीनही मतदारसंघावर बीजेपीचा झेंडा फडकवला नाशिक मध्यची निवडणूक ही नेहमीच अटीतटीची असते नाशिक मध्य हा कधी काली काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जायचा अजूनही काँग्रेस विचारसरणीचे लोक या मतदारसंघात पाहायला
मिळतात. मतदारसंघात असलेली स्मार्ट रस्त्यांची समस्या वाढणारी रहदारी आणि तुलनेने छोटे असलेले रस्ते चौका चौकात असलेली अतिक्रमणे नियोजनबद्ध नसलेली पार्किंगची समस्या अशा असंख्य समस्या या मतदारसंघात पाहायला मिळतात.

नुकताच या मतदारसंघातला अतिक्रमणाचा विषय थेट विधानसभेत मांडला गेला येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत देवयानी फरांदे यांचे कट्टर प्रतिस्पर्धी 2009 चे आमदार वसंत गीते यांचा आव्हान फरांदे समोर असणार आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने थेट गीतेंची उमेदवारी जाहीर केली आहे.बीजेपी कडून सध्याचे आमदार देवयानी फरांदे भाजपचे,लक्ष्मण सावजी, माजी सभापती हेमगौरी आडके ह्या इच्छुक आहेत तर भाजपचे माजी शहराध्यक्ष गिरीश पालवे यांनीही निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

शिंदे गटाचे शिवसेनेचे अजय बोरस्ते तर काँग्रेसच्या हेमलता पाटलांनीही नाशिक मध्ये जागा काँग्रेसला सुटावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून गजानन शेलारही तिकिटासाठी इच्छुक आहेत. 2009 ला मनसे कडून आमदार झालेले वसंत गीतें यांनी ह्या वेळेसही जोरदार लढत देण्यासाठी तयारी सुरू केली आहे. नुकतंच मुंबई नाक्यावर असलेलं त्यांचा ऑफिसही अतिक्रमण विभागाने हटवलाआहे.

सध्या हा ज्वलंत विषय या मतदारसंघात चांगलाच गाजणार आहे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीतही या मतदारसंघात महायुतीला चांगलाच फटका बसला आहे तर राजाभाऊ वाजेंना 88000 मते तर हेमंत गोडसेंना 84906 मते या मतदारसंघातून मिळाली महायुतीचा आमदार असतानाही महाविकास आघाडीने इथून घेतलेली आघाडी बीजेपी साठी नक्कीच धाकधूक वाढवणारी ठरणार आहे.

एकंदरीतच मध्य नाशिक या वेळेस देवयानी फरांदे यांच्या विजयाची हॅट्रिक घडवते की महाविकास आघाडीच्या वसंत गीतेंना पुन्हा विधानसभेत पाठवते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply