Dhananjay munde : धनंजय मुंडे राजीनामा प्रकरण गाजतंय; अजित पवार परदेशात?

धनंजय मुंडे राजीनामा प्रकरण गाजतंय; अजित पवार परदेशात?

मुंबई: बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे dhanajay Munde यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. मात्र, या विषयावर उपमुख्यमंत्री अजित पवार शांत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

शनिवारी या प्रकरणावर कारवाईच्या मागणीसाठी बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा निघाला. नागपूर हिवाळी अधिवेशनात या घटनेचे पडसाद उमटले होते. अधिवेशन संपताना अजित पवार यांनी देशमुख कुटुंबीयांची भेट घेऊन सूत्रधारांवर कठोर कारवाईचा इशारा दिला होता. तरी, मागील आठवड्याभरात धनंजय मुंडे यांच्या विरोधात तीव्र मागण्या होऊनही अजित पवारांचा मौन कायम आहे.

दरम्यान, अजित पवार परदेश दौऱ्यावर असल्याची चर्चा आहे, त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीमुळे राजकीय वातावरण आणखी तापले आहे.

राष्ट्रवादीचे नेते अडचणीत धनंजय मुंडे Dhananjay Munde यांच्यावर आरोपांचा भडिमार सुरू असताना, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षा संध्या सोनावणे यांचीही सीआयडी चौकशी झाली आहे. सोनावणे यांनी चौकशी राजकीय हेतूने झाल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणामुळे राष्ट्रवादीवर संशयाचे ढग दाटले आहेत.

अंजली दमानिया आणि भाजपचे आक्रमण देशमुख हत्या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुढाकार घेतल्याने या प्रकरणाची व्याप्ती वाढली आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी राष्ट्रवादीवर टीका करत प्रकरणाला जातीय रंग दिला आहे. परिणामी, अजित पवार गटाला सध्या राजकीय बचाव करताना मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे.

राजकीय वर्तुळातील चिंता धनंजय मुंडे Dhananjay यांच्यावर राजकीय आणि सामाजिक दबाव वाढत असताना अजित पवार यांच्या मौनामुळे राष्ट्रवादीची अधिक कोंडी होत असल्याचे चित्र आहे. आगामी दिवसांत या प्रकरणाला कोणते वळण मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.