Anti-Corruption : दिंडोरीचे तालुका वैद्यकीय अधिकारी लाच घेताना रंगेहाथ पकडले

dindori-taluka-vaidyakiya-adhikari-lach-ranghehat-pakadle

Dindori : दिंडोरी तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी सुभाष हरिभाऊ मांडगे (रा. श्री शक्ती अपार्टमेंट, फ्लॅट नंबर 2, कलानगर, म्हसरूळ) यांना वीस हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

तक्रारदार कोशिंबे येथे वैद्यकीय अधिकारी या पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या आरोग्य केंद्रात 2020-21 आणि 2023-24 या कालावधीत शासनाने विविध कामांसाठी ₹2,27,000 इतका निधी मंजूर केला होता. या निधीच्या खर्चाचे लेखापरीक्षण पूर्ण झाल्यानंतरही, संशयित मांडगे यांनी 10% कमिशन म्हणून ₹20,000 लाचेची मागणी केली होती.

तक्रारदाराने या प्रकरणाची तक्रार

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. पोलिस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विनोद चौधरी, पोलीस शिपाई अनिल गांगोडे आणि परशुराम जाधव यांच्या टीमने सापळा रचला आणि मांडगे यांना लाच घेताना पकडले.

ही कारवाई अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. संशयितांवर संबंधित कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.