माजी केंद्रीय मंत्री डॉ भारती पवार यांची   राहुल गांधींवर संतप्त प्रतिक्रिया

"Former Union Minister Dr. Bharti Pawar's Angry Response to Rahul Gandhi"

नाशिक: काँग्रेसकडून आदिवासींवर होणाऱ्या अत्याचारावर राहुल गांधींची चुप्पी साधली असून देश संपवायला निघालेला काँग्रेस पक्ष आता मुली माता भगिनी संपवायला निघाला अशी संतप्त प्रतिक्रिया माजी केंद्रीय कुटुंब कल्याण व आरोग्य राज्यमंत्री भारतीय पवार यांनी दिली आहे .

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

देशभरात नवरात्री उत्सव सुरू आहे आदिशक्तीची उपासना होत आहे. देशभरात महिलांवरील अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न होत असताना शासनाकडून याबाबत कडक पाऊले उचलण्यात देखील आली, मात्र देशाला देशोधडीला लावणाऱ्या काँग्रेस पक्षाचा युवक शहर अध्यक्ष संशयित आरोपी अमोल लोडे याने १२ वर्षीय मुलीवर अत्याचार करत बलात्कार केल्याची घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना येथील अल्पवयीन मुलीच्या बलात्कार प्रकरणातील संशयित आरोपी अमोल लोडे युवक काँग्रेसचा कोरपना शहर अध्यक्ष आहे. कॉन्व्हेंट शाळेत शिक्षक असलेल्या लोडे याने 12 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

उन्हाळ्यात ज्युनिअर IAS class घेण्याचे बहाण्याने आरोपी शिक्षकाने पीडित मुलीला शाळेत बोलावून अत्याचार केला. सोबतच तुझ्या आई-वडिलांना जिवे मारण्याची धमकी दिली पीडित मुलीला दिली होती. मात्र, पीडित मुलीने मैत्रिणीकडे या घृणीत प्रकरणाची वाच्यता केल्याने हा प्रकार उघडकीस आला.

याप्रकरणी, पोलिसांनी pocso कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पीडित मुलींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. पोलीस सर्व बाबी तपासून पाहणार असल्याचे पोलीस अधीक्षकांनी म्हटले आहे. कोरपना येथे झालेल्या अल्पवयीन मुलीच्या बलात्कार प्रकरणामुळे स्थानिक लोकं महिला अतिशय संतप्त आहे.

शाळकरी मुलीच्या बलात्कार प्रकरणात आरोपी असलेला शिक्षक आणि कोरपना शहर युवक काँग्रेसचा अध्यक्ष अमोल लोडे याची काँग्रेस पक्षाचा असून प्रकरण सावरासावर करण्यासाठी पक्षातून लोडे याला निष्काषित करण्यात येईल देखील परंतू यातून काँग्रेस पक्षाची महिलांप्रति असलेली भावना कुठल्या थराला जाऊन पोहचली हे दिसून येते.

चंद्रपूर मध्ये बारा वर्षीय मुलीवर अमोल लोडे नावाच्या नराधमाने दूष्कर्म केले. घडला प्रकार जर कुणाला सांगितला तर तुझ्यासहित तुझ्या आई-वडिलांना सुद्धा मारून टाकेल अशी धमकी नराधम देत होता. त्यामुळे सारवासराव करणारा काँग्रेस पक्ष काय महिलांचे काय संरक्षण करेल याच्या अपेक्षाच काँग्रेस नेते राहुल गांधी कडून नाहीत.

या सर्व घटनेचा निषेध करीत असून आरोपीला अत्यंत कठोर शिक्षा होण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जी हे सक्षम आहेतच, परंतु देश संपवायला निघालेल्या काँग्रेस पक्षाची मानसिकता किती माता,भगिनी आणि आदिवासींवर अत्याचार करणार याचे उत्तर काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी द्यावे.

Leave a Reply