नाशिक: गंगापूर पोलिस ठाण्यात दाखल शरीराविरुद्धच्या गंभीर गुन्ह्यात फरार असलेला सराईत गुन्हेगार रवींद्र ऊर्फ माया दामोदर गांगुर्डे (२७, रा. शिवाजीनगर, सातपूर) याला गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाने अटक केली आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
गांगुर्डे हा दीर्घकाळ फरार होता. पोलिस त्याच्या मागावर होते. त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवत असताना, तो आपल्या राहत्या घराजवळ वावरत असल्याची गोपनीय माहिती अंमलदार महेश खांडबहाले व तेजस मते यांना मिळाली.
माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सापळा रचला. गांगुर्डेने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्याला शिताफीने पकडले.