गजूभाऊ घोडके भुजबळांना आव्हान देणार; येवला मतदारसंघातून अपक्ष उमेदवार

Screenshot 2024 10 23 101204

नाशिक : ओबीसींचे मसीहा म्हणून ओळखले जाणारे छगन भुजबळ यांच्याविरोधात येवला मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्धार त्यांचेच एक खंदे समर्थकओबीसी सुवर्णकार समितीचे प्रदेशाध्यक्ष गजूभाऊ घोडके यांनी घेतल्याने राजकीय वर्तुळात त्याची एकच चर्चा सुरू झाली आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

गजू घोडके हे ओबीसींचे खंदे नेते म्हणून ओळखले जातात. ओबीसींच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांनी मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. अनेकदा आंदोलनेही केले. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांना अनेकदा त्यांनी अंगावर घेतले आहे. ओबीसींचे विद्रोही नेते म्हणून गजू घोडके ओळखले जातात. छगन भुजबळ यांना त्यांनी सातत्याने मदत केली आहे. आणि त्यामुळेच आता त्यांच्या विरोधातच दंड थोपटण्यामागचे नेमके कारण काय, याबाबत विविध तर्कवितर्क काढले जात आहेत.

तुम्ही खालच्या वर्गाचे आहात असे जरांगे पाटील आम्हाला म्हणतात. सोनार, स तार, लोहार, शिंपी, धोबी, कुं भार आधी बारा बलुतेदारांना कोणीही विचारायला तयार नाही आणि म्हणूनच आमची ताकद दाखवून देण्यासाठी आपण हा निर्णय घेतल्याचे गजू घोडके यांनी सांगितले. नाशकात मुंबईनाका येथे महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी ओबीसीचा विशिष्ट समाज सोडला तर बारा बलुतेदारांचे अन्य कुणालाच बोलवण्यात आले नव्हते. विधान परिषदेवरही ओबीसींच्या काही घटकांचेच मक्तेदारी असते, त्यामुळे तेथेही आम्ही निवडून येऊ शकत नाही.
महामंडळाच्या नियुक्ती करतानाही खऱ्या ओबीसींना डावलण्यातयेते. कोणत्याही कार्यक्रमाच्यावेळी महत्त्वाच्या सोनार, सुतार, शिंपी, धोबी, सुतारसमाजाच्या लोकांना व्यासपीठावर खुर्ची दिली जात नाही. आम्ही सतत खालीच बसायचे का? असा सवाल गजू घोडके यांनी केली. ओबीसी समाजाच्या लोकांची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी तसेच आमची ताकद दाखवून देण्यास येवला मतदार संघातून भुजबळांविरुद्ध दंड थोपटण्याचा निर्णय आपण घेतला असून लवकरच आपण येवल्यातून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे गजू घोडके यांनी नमूद
केले.