Nashik : गावठी बंदूक आणि शस्त्रसाहित्यासह दरोड्याच्या तयारीत असलेले दोनजण अटकेत

Gavthi Banduk ani Shastrasahityasah Darodyachya Tayarit Aslele Donjan Atket

नाशिक, 24 नोव्हेंबर: उपनगर पोलीस ठाण्याच्या गस्ती पथकाने शनिवारी मध्यरात्री संशयास्पद हालचाली करत असलेल्या टोळीतील दोघांना अटक केली. गस्तीदरम्यान सहायक निरीक्षक सुयोग वायकर आणि पोलीस कर्मचारी सुंदरनगर भागातील जयभवानी रस्त्यावर गस्त घालत असताना, शकुंतला पेट्रोल पंपाशेजारी काही जण संशयास्पद हालचाली करताना दिसले.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

पोलिसांनी त्यांना थांबवून चौकशी केली असता, स्वप्नील उर्फ भूषण गोसावी आणि बबलू यादव यांच्याकडे गावठी बंदूक, दोन जिवंत काडतुसे, कोयता, नायलॉन दोरी आणि मिरची पूड सापडली. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले असून, उर्वरित सहा संशयितांचा शोध सुरू आहे.

टोळीतील संशयितांची नावे:
स्वप्नील उर्फ भूषण गोसावी, दानिश शेख, बबलू यादव, सागर म्हस्के, तुषार पाईकराव, सुरज भालेराव, अनिकेत देवरे, आणि रोहित लोंढे.

पोलीस तपासात असे उघड झाले की, टोळी दरोड्याच्या तयारीत होती. संशयितांवर भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून, उर्वरित आरोपींच्या अटकेसाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे.