Nashik: घोलपांची ठाकरे गटात घरवापसी; नाशिकच्या राजकारणात रंगत वाढली

gholapanchi-thackeray-gatat-gharwapsi-nashikchya-rajkaranat-rangat-vadhali.com

नाशिकःशिवसेनेचे माजी मंत्री बबनराव घोलप यांनी आज मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून पुन्हा एकदा ठाकरे गटात प्रवेश केला. आठ महिन्यांपूर्वी घोलप यांनी शिवसेना सदस्यपदाचा राजीनामा देऊन शिंदे गटात प्रवेश केला होता. मात्र, आता ते पुनश्च ठाकरे गटात परतले आहेत.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

घोलप यांच्या या पुनरागमनासाठी ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड यांनी विशेष शिष्टाई केली होती. देवळाली विधानसभा मतदारसंघातील घोलप कुटुंबाचा राजकीय वारसा लक्षात घेऊन २०१९ च्या निवडणुकीत या मतदारसंघाची तिकिट योगेश घोलप यांना देण्यात आली होती.

उद्धव ठाकरे यांनी नाशिक शहरातील महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांना प्रेरित केले. शिवसेनेच्या पुनरुत्थानासाठी घोलप यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरेल असे त्यांनी सांगितले.

1000223291

यावेळी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड, उपजिल्हाप्रमुख जगन आगळे, माजी नगरसेवक भय्या मणियार, तालुका प्रमुख प्रकाश म्हस्के यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

घोलप यांच्या या पुनरागमनामुळे आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे बळ मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.