Ghoti school controversy: नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. घोटी येथील एका खाजगी शाळेत आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात फायटर, चाकू, पत्त्यांचे कॅट, कंडोम आणि सायकलची चेन आढळल्याने खळबळ उडाली आहे. शिक्षकांनी अचानक घेतलेल्या तपासणीमुळे हे धक्कादायक वास्तव समोर आले.
विद्यार्थ्यांच्या ‘दप्तरात’ गुन्हेगारीची बीजं? (Ghoti school controversy)
शाळेतील शिक्षकांनी काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांच्या विचित्र हेअरस्टाईल्सवर कारवाई करत त्यांचे केसच कापले होते. त्यानंतर घेतलेल्या तपासणीदरम्यान अनेक विद्यार्थ्यांच्या पाठीवर गुन्हेगारी साहित्य असल्याचे उघड झाले. यामुळे पालकांमध्येही चिंता व्यक्त होत आहे. शाळेने पालकांना बोलावून समज दिली असून, भविष्यात अधिक कठोर उपाययोजना करण्याचा विचार सुरू आहे.
नाशिकरोड पोलीस ठाण्यात महिलांची ‘फ्री स्टाईल’ हाणामारी (Ghoti school controversy)
दरम्यान, नाशिकरोड पोलीस ठाण्यात आणखी एक गोंधळजनक घटना घडली आहे. घरगुती वाद घेऊन पोलीस ठाण्यात आलेल्या महिलांमध्येच तुफान हाणामारी झाली. शीतल गवळी (महिला पोलीस अंमलदार) यांच्या फिर्यादीवरून आशा पाथरे, रेखा आल्हाट आणि सीमा राखपसरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस ठाण्याच्या आवारातच घडलेली ही ‘फ्री स्टाईल’ झटापट नागरिकांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे.