Gold price today : सोनं विकत घ्यायचंय? घाई करा! 15 मार्चपर्यंत तोळ्याचा दर लाखाच्या पार जाणार?

Gold prices

Gold price today: गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या दरामध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. 20 फेब्रुवारी 2025 रोजी सोन्याचा दर जीएसटीसह 92,185 रुपये प्रति तोळा झाला आहे. या झपाट्याने वाढणाऱ्या किंमतीमुळे गुंतवणूकदार आणि ग्राहक चिंतेत आहेत.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

एक महिन्यात तब्बल 13,285 रुपयांनी सोन्याचा ( Gold) दर वाढला!
सोन्याची किंमत जानेवारीच्या पहिल्या दिवसापासून सतत वाढत आहे. जानेवारी 1 रोजी सोन्याचा दर 78,880 रुपये प्रति तोळा होता, तर 31 डिसेंबर रोजी तो 77,000 रुपये होता. म्हणजेच नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच सोन्याच्या दरवाढीचा आलेख चढता दिसत आहे.

Gold price today लग्नसराईत सोनं आणखी महागणार?
मार्च महिन्यात लग्नसराई असल्यामुळे सोन्याच्या मागणीत मोठी वाढ अपेक्षित आहे. तज्ज्ञांच्या मते, 15 मार्चपर्यंत सोन्याचा दर 1,00,000 रुपये प्रति तोळ्याच्या घरात पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोनं खरेदी करायचं असेल, तर आत्ताच योग्य संधी आहे!

सोन्याचा आठवड्याभरातील दरवाढ (फेब्रुवारी 2025)

  • 4 फेब्रुवारी: ₹83,010 (10 ग्रॅम)
  • 5 फेब्रुवारी: ₹84,657
  • 6 फेब्रुवारी: ₹84,672
  • 7 फेब्रुवारी: ₹84,699
  • 10 फेब्रुवारी: ₹85,665
  • 11 फेब्रुवारी: ₹85,903
  • 20 फेब्रुवारी: ₹92,185 (जीएसटीसह)

भविष्यात सोनं 1,00,000 रुपये तोळा होईल का?
विश्लेषकांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरता, वाढती महागाई आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्यात होणारी घट ही सोन्याच्या दरवाढीची प्रमुख कारणे आहेत. अशा परिस्थितीत गुंतवणूकदार आणि ग्राहकांसाठी हे निर्णयात्मक दिवस आहेत.