सौराष्ट्रात पोरबंदर येथे हेलिकॉप्टर अपघातग्रस्त… तीन जणांचा मृत्यू

Helicopter crash in Porbandar in Saurashtra... Three people died

ऑनलाईन डेस्क भारतीय तटरक्षक दलाच्या (ICG) ALH MK-III या हेलिकॉप्टरला ५ जानेवारी रोजी गुजरातमधील पोरबंदर विमानतळाच्या धावपट्टीवर दुपारच्या सुमारास अपघात झाला. तटरक्षक दलाचे हे हेलिकॉप्टर, दोन चालक आणि एक बचावपटू (एअरकू डायव्हर) यांच्यासह नियमित प्रशिक्षणाच्या उड्डाणावर होते.

दुर्घटनेनंतर ताबडतोब, तिघांना बाहेर काढण्यात आले आणि पोरबंदरच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. या दुर्घघटनेमागची कारणे चौकशी समितिकडून तपासली जात आहेत. कमांडंट (जेजी) सौरभ, डेप्युटी कमांडंट एसके यादव आणि मनोज प्रधान नाविक यांच्यावर सेवा परंपरा आणि इतमामानुसार अंत्यसंस्कार केले जातील.