Horoscope : शुक्रवार, 20 डिसेंम्बर 2024.
मार्गशीर्ष कृष्ण पंचमी.
राहुकाळ – सकाळी 10:30 ते दुपारी 12
“आज चांगला दिवस आहे”
Horoscope : आजचा दिवस खास! :20 डिसेंम्बर रोजी जन्मलेल्यांमध्ये वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुमच्यावर चंद्र आणि गुरू ग्रहाचा प्रभाव आहे.
तुम्ही ध्येयवादी असून तुमच्या प्रगल्भ संकल्पना शक्ती असते मान मरातब आणि प्रतिष्ठा यांची आवड असते. दुसऱ्याच्या सूचनेप्रमाणे तुम्ही कृती करता याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमचे स्वतंत्र विचार नाही परंतु दुसऱ्याचे विचार व कल्पना तुम्ही प्रत्यक्ष आणण्याचे कर्तुत्व तुमच्याकडे आहे .तुमच्या सहकारी वृत्ती असून दुसऱ्याचे विचार व भावना यांची कदर करतात चांगले वाईट तुम्ही सहजपणे समजू शकता .स्वप्नाळू स्वभाव असतो. कामात व्यवस्थितपणा टापटीप आढळून येते. आळशीपणा असतो. कल्पना व महत्त्वकांक्षा यांचा संगम झाल्यामुळे मोठमोठे प्रकल्प घेण्यात तुम्हाला रस असतो. गुरु ग्रहामुळे तत्वज्ञान व स्थिर वृत्ती प्राप्त होत असली तरी चंद्रामुळे अस्वस्थता व चंचलतेचा प्रत्यय येतो .तुम्हाला लांबच्या प्रवासाची आवड आहे. दुसऱ्याला आकर्षण घेण्याची एक संमोहन शक्ती तुमच्याकडे आहे. कौटुंबिक जीवनात उतार चढाव होतो. धर्माबद्दल तुम्हाला ओढ असते पण कर्मकांडावर विश्वास नसतो .निसर्गाबद्दल प्रेम असून समुद्र तारे यांच्या बद्दल आकर्षण असते. तुमचा उत्कर्ष 29 वर्षानंतर होतो. दुसऱ्याला मदत करणे आणि यात तुम्हाला आनंद होतो महत्त्वकांक्षी योजना मुळे आर्थिक स्थितीत चढ-उतार होत असतो .वयाच्या 38 वर्षापासून आर्थिक स्थिती समाधानकारक बदल होतो. अस्वस्थ स्वभावामुळे विनाकारण खर्च होतो .तुम्ही अतिशय प्रेमळ आपुलकीने वागणाऱ्या व निष्ठावान आहात. तुमच्यात लहरीपणा असतो. प्रतिष्ठेला जपतात .दिमाख व वैभवशाली जीवनाकडे तुमचा असतो. बागबगीच्या व पाळीव जनावरांची आवड असते. घरात आनंद व शांतता ठेवण्यात कडे तुमचा कल असतो .आपल्या पतीला सर्व प्रकारे साथ देण्यात तुम्ही वाकबगार असता. उत्तम सह धर्मचारिणी म्हणून लौकिक मिळवता. ज्यांच्याकडे मान मरातब ,प्रतिष्ठा ,अधिकार व महत्त्वकांक्षा आहे अशा मित्र-मैत्रिणींशी चांगले जुळते.
शुभ दिवस- सोमवार,गुरुवार, शुक्रवार
शुभ अंक – २,६,९
शुभ रंग – पांढरा, बदामी,जांभळा
शुभ रत्न:-मोती,हिरा, पुष्कराज,चंद्र मणी
आजचे राशिभविष्य
मेष:- पंचम स्थानी चंद्र आहे. सरकारी कामे मार्गी लागतील.प्रवासातून त्रास होऊ शकतो. खाण्याची पथ्ये पाळा.
वृषभ:- आज उत्तम दिवस आहे .सरकारकडून लाभ होतील.शुभ समाचार मिळतील.मनातल्या इच्छा पूर्ण होतील. खर्चात मात्र वाढ होऊ शकते.
मिथुन:- आज नोकरीत व्यस्त रहाल.छोट्या सहली घडतील.मित्र मैत्रिणी शी भेटीगाठी होतील.
कर्क:- आज गोड पदार्थांचा आस्वाद घ्याल.कुटुंबियांसमवेत एखाद्या समारंभात भाग घ्याल.डोळ्यांची काळजी घ्या.
सिंह:- आज छान दिवस आहे. तुमच्याच राशीत चन्द्र आहे.आत्मविश्वास वाढेल.वडीलधाऱ्याकडून लाभ होईल.झटपट निर्णय घ्याल.
कन्या:- आज व्यय स्थानी चन्द्र आहे.वादविवाद टाळा.खर्चाचे प्रमाण वाढेल.आरोग्य सांभाळा.
तुळ:- आज लाभात चन्द्र आहे.आर्थिक दृष्टीने चांगला. विवाह इच्छुकांना खूष खबर मिळेल.सहलीचे बेत ठरतील.मैत्रिणीमार्फत लाभ होतील.
वृश्चिक:- कामाच्या ठिकाणी शाबासकी मिळेल.कामानिमित्त प्रवास घडेल.घरगुती वातावरण आनंदी राहील.
धनु:- आज घरगुती कामात व्यस्त रहाल.आळस दूर करून कामास लागावे लागेल.वडीलधार्या नची मर्जी राखावी लागेल.
मकर:- आजअष्टमात चन्द्र आहे. महत्वाची कामे पुढे ढकला.खर्चात वाढ होईल. मात्र श्री. हनुमान उपासना लाभदायक ठरेल.
कुंभ:- कौटुंबिक सौख्य लाभेल. छोट्या सहली घडतील. आवडत्या छंदास वेळ द्याल.स्वादिष्ट भोजनाचा आनंद घ्याल.पतीचे सहकार्य लाभेल.
मीन: आज गोड बोलून कामे करून घ्या. शारीरिक स्वास्थ्य लाभेल.माहेरकडून शुभ बातमी मिळेल.उत्साह वाढेल.
सौ मधुरा मंगेश पंचाक्षरी नाशिक
9272311600
लग्न ,करियर, गुण मीलन विषयी
सशुल्क पत्रिका पाहण्यासाठी संपर्क करावा.
He Pan Wacha : Rashibhavishya: आजचा दिवस अनुकूल की प्रतिकूल? जाणून घ्या तुमच्या राशीचा प्रभाव!