बुधवार, ३० एप्रिल २०२५. वैशाख शुक्ल तृतीया. वसंत/ ग्रीष्म ऋतू. विश्वावसूनाम संवत्सर. शके १९४७, संवत २०८१. राशिभविष्य
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
राहू काळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
चंद्र नक्षत्र – रोहिणी/ (दुपारी ४.१८ नंतर) मृग. आज जन्मलेल्या बाळाची राशी – वृषभ. (शोभन योग – शुभ)
“आज शुभ दिवस आहे. अक्षय्य तृतीया, श्री. बसवेश्वर जयंती
मेष:- चंद्र लाभ बुध, चंद्र युती गुरू. वाहन खरेदी होईल. कामे मार्गी लागतील. वरिष्ठ खुश होतील. संपत्ती वाढेल.
वृषभ:- अनुकूल दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. सामाजिक कार्य कराल. नोकरीत चांगले अनुभव येतील. मेजवानी मिळेल. मन आनंदी राहील.
मिथुन:- संमिश्र ग्रहमान आहे. व्यय स्थानी चंद्र आहे. तरीही सुखद बातमी समजेल. आध्यत्मिक प्रगतीसाठी उत्तम कालावधी आहे. दानधर्म कराल. खर्च वाढतील.
कर्क:- लाभ स्थानी चंद्र आहे. नवीन खरेदी होईल. अचानक लाभ होतील. मन आनंदी राहील. कार्य सिद्धीस जाईल.
सिंह:- आर्थिक लाभ होतील. व्यवसाय वाढेल. वक्तृत्व चमकेल. नवीन खरेदी होईल. नोकरीत संमिश्र अनुभव येतील.
कन्या:- प्रवास घडतील. कामांना गती प्राप्त होईल. पूर्वजांची पुण्याई अनुभवास येईल. आरोग्य सांभाळावे लागेल.
तुळ:- अष्टम स्थानी चंद्र आहे. आध्यत्मिक लाभ होतील. दानधर्म कराल. सामाजिक कार्यातून नावलौकिक वाढेल.
वृश्चिक:- व्यावसायिक यश लाभेल. मित्रांकडून चांगले सहकार्य लाभेल. पत्नीची मोलाची साथ मिळेल. योग्य सल्ला मिळेल.
धनु:- संमिश्र ग्रहमान आहे. कामात सहकार्य मिळेल. मन प्रसन्न राहील. आर्थिक भरभराट होईल. साधन संपत्ती वाढेल.
मकर:- व्यवसाय वृद्धी होईल. उत्साह वाढेल. संततीकडून चांगली बातमी समजेल. व्यावसायिक प्रगती होईल. राजकीय यश मिळेल.
कुंभ:- तुमच्या राशीतील जमीन व्यवहारातून लाभ होतील. घरगुती कामे आज पूर्ण होतील. व्यवसायाचे नियोजन काटेकोरपणे करू शकाल.
मीन:- अनुकूल ग्रहमान आहे. लेखकांना उत्तम यश लाभेल. हाती घेतलेले काम पूर्ण होईल. उत्साह वाढवणाऱ्या घटना घडतील. वाहन सौख्य लाभेल.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)