Horoscope Today आजचे राशीभविष्य सोमवार, 29 ऑक्टोबर 2024.

/todays-horoscope-monday-22-10-2024/

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

मंगळवार, 29 ऑक्टोबर 2024. अश्विन कृष्ण द्वादशी/त्रयोदशी.

राहू काळ – दुपारी 3 ते 4:30

आज 8 वा पर्यंत चांगला दिवस .धनत्रयोदशी, गुरुद्वादशी यमदीपदान

29 ऑक्टोबर रोजी जन्मलेल्यांमध्ये वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुमच्यावर चन्द्र आणि शुक्र या दोन ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही अभ्यासू वृत्तीचे असून दुसऱ्याला शिकवणे तुम्हाला आवडते. इतरांना मदत करते वेळी घाईघाईने निर्णय घेतले जातात .तुमचे व्यक्तिमत्व विरोधाभासी असते. प्रेमाच्या बाबतीत प्रचलित रुढी मोडण्यास तयार असतात. जीवन यशस्वी होण्यासाठी तुम्ही सावधगिरीने वागता. सर्व गोष्टी झटपट केलेल्या आवडतात .श्रीमंत व्यक्तीशी विवाह होऊन विवाह नंतर भाग्योदय होतो .उच्च पदस्थ लोकांकडून तुम्हाला मदत मिळते ,त्याबाबतीत तुम्ही नशीबवान असतात.
तुम्हाला मानमरातब आणि प्रतिष्ठा यांची आवड असते. दुसऱ्याच्या सूचनेप्रमाणे तुम्ही वागता ,याचा अर्थ असा नाही की तुमच्याकडे स्वतंत्र विचार नाही परंतु दुसऱ्याचे विचार आणि कल्पना प्रत्यक्षात आणण्याचे कर्तुत्व तुमच्याकडे आहे. तुम्ही समाजप्रिय आहात. नावीन्य व प्रवासाची आवड असते. तुम्ही हुशार ,तल्लख आणि शास्त्रीय गोष्टीची आवड असणारे असता. तुमचा सहवास नेहमी उत्साहवर्धक असतो .प्रेम ,सहानुभूती व आदर या गोष्टी तुम्हाला अधिक महत्त्वाच्या वाटतात. तुम्ही बोलण्यात आकर्षक व मोहकपणा असल्यामुळे इतर लोकांवर तुमची छाप पडते. मैत्रिणींच्या सुखदुःखाचा तुम्ही सहानुभूतीपूर्वक विचार करता.चांगले वाईट यातील फरक समजू शकतात .कल्पना व उत्साह यांचा संगम झाल्याने मोठमोठे प्रकल्प घेण्यात तुम्हाला आनंद वाटतो. स्वतःच्या उद्योगात मग्न राहणे आवडते. तुमच्यात नम्रता असून आपली गुणवैशिष्ट्ये दुसऱ्याच्या नजरेत आणण्याचा प्रयत्न करतात कायद्याचे पालन करणे आवडते .वयाच्या 38 व्या वर्षापासून आर्थिक स्थितीत समाधानकारक बदल होतात. तुम्ही खर्चिक असून आवडत्या व्यक्तीवर खर्च करता. परंतु सर्वसाधारण व्यक्ती पेक्षा जास्त पैसा तुम्हाला मिळतो .विवाह हा तुमच्या आवडीचा विषय असून लवकर लग्न करता. वैवाहिक जीवनात येणारे अडीअडचणींना शांतपणे तोंड देता .तुम्ही उत्कृष्ट गृहिणी असून गृहकृत्यदक्ष असतात .तुम्ही हुशार ,हरहुन्नरी ,कर्तुत्ववान असून पतीशी जुळवून घेता. तुमच्या लोकप्रियतेमुळे घरी येणारे जाणाऱ्यांची संख्या बरीच असते .घरात व बाहेर दोन्ही ठिकाणी तुम्ही रमता. महत्त्वाकांक्षी माणसाची उत्तम पत्नी होऊ शकता.विनोदी स्वभाव व वाकचातुर्य असल्याने सामाजिक जीवनात यशस्वी होता .तुम्हाला स्वतःच्या दिसण्याचा, व्यक्तिमत्त्वाचा व घराचा अभिमान असून तुमच्या वागण्यामुळे इतरांना मत्सर वाटतो. तीव्र इच्छाशक्ती असून नीटनेटकेपणा व चांगल्या कपड्यांचे शौकीन असता.

शुभ दिवस :- मंगळवार ,सोमवार ,शुक्रवार

शुभ रंग :- पांढरा ,पिवळा ,निळा.

शुभ रत्ने:- हिरा ,मोती .

आजचे राशिभविष्य

मेष:- आज उधारी वसूल होईल.प्रवासाचे योग.शत्रू पराभूत होतील.

वृषभ:- आज चांगला दिवस.संतती कडे लक्ष द्या.शैक्षणिक यश मिळेल.

मिथुन:- आज अनुकूल दिवस.नवीन वास्तू,वाहन खरेदी चे योग.

कर्क:-मैत्रिणींनो आज लेखनात प्रसिद्धी लाभेल .छोटे प्रवास घडतील.

सिंह:- आज धनप्राप्ती चांगली होईल.कामात तुमचा वरचष्मा राहील.कटू बोलणे टाळा.

कन्या:- आज छान दिवस.आत्मविश्वास वाढेल.अनपेक्षित दूरचे प्रवास ठरतील.लक्ष्मी प्राप्ती चे योग.

तुळ:- आज सामान्य दिवस.शत्रूंचा पराभव होईल.खर्च होईल.

वृश्चिक:- आज अतिशय सुंदर दिवस.लाभात चन्द्र आहे.सर्व प्रकारचे लाभ होतील.

धनु:- आज कामाच्या ठिकाणी वरीष्ठ खूष राहतील.बढती,बदली ची शक्यता.

मकर:- आज धार्मिक कार्यात व्यस्त रहाल.दूरच्या सहली चे बेत आखले जातील.

कुंभ:- आज अष्टमात चन्द्र आहे.आकस्मित खर्च होतील पण त्यातून आनंद लाभेल.रुटीन चालु ठेवा.वाहन काळजीपूर्वक चालवा.

मीन:- आज भेटवस्तू मिळू शकते. घरात वादविवाद टाळा. बोलण्यातून गैरसमज टाळा.

सौ मधुरा मंगेश पंचाक्षरी नाशिक
9272311600
लग्न ,करियर, गुण मीलन विषयी
सशुल्क पत्रिका पाहण्यासाठी संपर्क करावा.