Horoscope Today आजचे राशीभविष्य सोमवार, 29 ऑक्टोबर 2024.

/todays-horoscope-monday-22-10-2024/

सोमवार, 28 ऑक्टोबर 2024. अश्विन कृष्ण एकादशी

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

राहू काळ – सकाळी 7:30 ते 9

रमा एकादशी,वसुबारस. आज चांगला दिवस.सवत्स धेनु पूजन.

28 ऑक्टोबर रोजी जन्मलेल्यांमध्ये वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुमच्यावर रवी आणि शुक्र या दोन ग्रहांचा प्रभाव आहे. तुमचा जन्म 28 तारखेला झाला असल्याने तुमच्यावर चंद्र व शनी या ग्रहांचे सुद्धा वर्चस्व असते .
तुमचा स्वभाव स्वप्नाळू असून प्रकृतीने गंभीर आहात. शैक्षणिक संस्था, सामाजिक दवाखाने अशा संस्थांशी तुमचा संबंध येतो .तुम्हाला तुमच्या भावना सहजपणे व्यक्त करता येत नाही त्यामुळे इतरांचा गैरसमज होऊ शकतो. सामाजिक व वैयक्तिक जीवनात अनेक अडीअडचणींना तोंड द्यावे लागते .अनपेक्षित बदल तुमच्या कौटुंबिक व व्यावसायिक जीवनात होतात. स्वतःच्या व्यवसायात यश मिळते. तुम्ही फार संवेदनाशील असून लहान लहान गोष्टींनी दुखावले जातात.
तुमची वृत्ती स्वतंत्र असून विचारातही स्वतंत्रपणा आहे .सतत बदल करण्याकडे ओढ असतो. कोणत्याही गोष्टीत फार काळ रमत नाही .जीवनात काहीतरी सनसनाटी असावे असे तुम्हाला वाटते .उद्योगप्रिय असून सतत कामात मग्न राहणे आवडते .प्रेम, सहानुभूती, आदर ही तुमची वैशिष्ट्ये आहेत .कला व प्रवासाची आवड आहे. तुम्ही उत्तम सल्लागार असून विषयाचे महत्त्व चांगल्या प्रकारे समजून सांगतात .उच्च प्रतीचे कपडे, दागदागिने ,सुगंधी द्रव्य याची तुम्हाला आवड असते. पैशाच्या बाबतीत नशीबवान असून चांगला पैसा मिळतो. परंतु पैसा वाचवण्यापेक्षा खर्चीक वृत्ती असते .मुले व प्राणी फार प्रिय असतात. हुशार व शास्त्राची आवड असलेले, व्यापारी वृत्तीचे व झटपट काम करणारे असतात. हातातील कार्यात यश कसे मिळवावे याचे पूर्वनियोजन तुम्ही करता. विशाल दृष्टीकोन असतो. इच्छाशक्ती दांडगी असते. व्यक्तिमत्व प्रसन्न असून आळशीपणा खपत नाही. संशोधक वृत्ती असते. भाषा चातुर्य असल्याने दुसऱ्यावर झटकन छाप पडते. उद्योगधंद्याशी संबंध असल्याने समृद्ध असता .चाणाक्ष व धूर्त स्वभाव असतो ,त्यामुळे कष्टाचा मोबदला उत्तम प्रकारे मिळतो. विनोदी स्वभाव व वाकचातुर्य असल्याने सामाजिक जीवनात यश मिळते .तुम्हाला अनेक गोष्टीत रस असतो. स्वभाव रुढीनिष्ठ नसतो .स्वतःचा व्यवसाय करून उत्पन्नात भर घालता .महत्त्वकांक्षी माणसाची उत्तम पत्नी तुम्ही होता .उत्तम गृहिणी असून गृह कृत्यदक्ष असता.

शुभ दिवस :-रविवार ,सोमवार गुरुवार ,शुक्रवार

शुभ रंग :-सोनेरी ,पिवळा नारंगी ,निळा

शुभ रत्ने:- माणिक, पाचु,मोती

आजचे राशिभविष्य

मेष:- आज संतती कडे अधिक लक्ष द्यावे लागेल .अकल्पीत लाभ होईल.

वृषभ:- आज घरगुती कामात वेळ जाईल.हरवलेली वस्तू सापडल्याने आनंदी व्हाल.

मिथुन:-आज मस्त आनंदी दिवस. व्यवसायात वाढ होईल. आर्थिक प्राप्ती चांगली होईल.लिखापढी करण्यापूर्वी कागदपत्रे तपासून घ्या.

कर्क:- आज वाकचतुर्य ने लाभ होतील.अचानक धनलाभाची शक्यता.

सिंह:- आज कामानिमित्त धावपळ वाढेल. अकारण चिंता वाटेल.नोकरी व्यवसायात अचानक लाभ होतील.

कन्या:- आज आज नेहमीची कामे चालू ठेवा .नवीन काही सुरुवात नको .संध्याकाळ आनंदाची

तुळ:- आज पतीसोबत वेळ व्यतीत कराल. काहीतरी नवीन आयोजन कराल .लवकरच खुशखबर मिळेल.

वृश्चिक:- आज कामाचे नियोजन बदलावे लागेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील.

धनु:- आज काही नवीन करावे असे तुम्हाला वाटेल ,पण सबुरीने घ्या .धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल.

मकर:- आज रुटीन चालू ठेवा.वारसाहक्काने लाभ होऊ शकतो. वाहन चालवताना काळजी घ्या.

कुंभ:- आज आरोग्याच्या तक्रारी राहतील.पतीकडून लाभ होईल.

मीन:- आज मन अस्वस्थ राहील. ध्यानधारणा करा. घाई गडबड नको. संयमाने घ्या.

सौ मधुरा मंगेश पंचाक्षरी नाशिक
9272311600
लग्न ,करियर, गुण मीलन विषयी
सशुल्क पत्रिका पाहण्यासाठी संपर्क करावा.