नाशिकमध्ये संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी ओबीसी नेते प्रा. श्रावण देवरे यांच्या घरावर निषेध आंदोलन

In Nashik, Shivaji Brigade Activists Protest at the Home of OBC Leader Prof. Shravan Deore

नाशिक प्रतिनिधी,,:नाशिकमध्ये संभाजी ब्रिगेडच्या वतीने ओबीसी नेते आणि प्रा. श्रावण देवरे यांच्या घरावर निषेध आंदोलन करण्यात आले. मराठा समाजातील महिलांविषयी सोशल मीडियावर अश्लील आणि विकृत लिखाण केल्याचा आरोप देवरे यांच्यावर आहे. या लिखाणामुळे मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असून, याच कारणास्तव संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरावर शाही फेकून आणि बांगड्यांचे तोरण लावून तीव्र निषेध नोंदवला.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

प्रा. देवरे यांनी सोशल मीडियावर केलेल्या लिखाणामुळे दोन समाजांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यांना याबाबत जाब विचारण्यासाठी आंदोलक त्यांच्या घरी पोहोचण्याआधीच, देवरे यांनी पोलिसांच्या साहाय्याने गाशा गुंडाळून तेथून पलायन केले.

संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी उपनगर पोलीस स्टेशन येथे जाऊन पोलीस निरीक्षकांची भेट घेतली आणि देवरे यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. या आंदोलनात नाना बच्याव (नाशिकचे उपोषण कर्ते), संभाजी ब्रिगेडचे जिल्हाप्रमुख शरद लभडे, महानगर प्रमुख प्रफुल्ल वाघ, नितीन रोठे पाटील, विकी गायधनी, मंदार धिवरे, बळीराम घडवंजे, अनिल आहेर, नितीन काळे, रवींद्र लोखंडे, तसेच महिला पदाधिकारी प्रज्ञा टुपके, मीनाक्षी राठोड, शोभा चाफेकर, आणि सोनी डोके उपस्थित होते.

कार्यकर्त्यांनी पोलिस प्रशासनाकडे देवरे यांच्या विरोधात तातडीने कारवाई करण्याची विनंती केली आहे, तसेच महिलांच्या मान-सन्मानासाठी कठोर पावले उचलण्याची मागणी केली आहे.

Leave a Reply