India vs England 4th T20 Match Live Updates | IND vs ENG Pune Match | Rinku Singh Playing 11 | India vs England T20 Series 2025
पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये आज (शुक्रवारी) भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 मालिकेतील चौथा सामना रंगणार आहे. ही लढत दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाची असून, भारतासाठी हा सामना मालिका जिंकण्याची सुवर्णसंधी असेल, तर इंग्लंडसाठी मालिकेत बरोबरी साधण्याचा अंतिम प्रयत्न असेल.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
भारतीय संघाचा आत्मविश्वास, इंग्लंडची कमबॅक तयारी
सध्या तीन सामन्यांनंतर भारत 2-1 ने आघाडीवर आहे. मात्र, इंग्लंडने तिसरा सामना जिंकत पुनरागमन केले आहे. त्यामुळे हा सामना अधिक चुरशीचा ठरणार आहे. भारतीय संघासमोर घरच्या मैदानावर मालिका जिंकण्याचे लक्ष्य असेल, तर इंग्लंड संघ पूर्ण ताकदीनिशी सामना जिंकून मालिकेच्या निर्णायक टप्प्यात पोहोचण्याचा प्रयत्न करेल.
रिंकू सिंगचा पुनरागमन, प्लेइंग-11 मध्ये बदल होणार?
भारतीय संघासाठी एक आनंदाची बातमी म्हणजे, मधल्या फळीतील धडाकेबाज फलंदाज रिंकू सिंग आता पूर्ण फिट झाला आहे. पाठीच्या दुखापतीमुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यातून बाहेर असलेल्या रिंकू सिंगला आजच्या सामन्यात संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. सहायक प्रशिक्षक रायन टेन डोईश्चे यांनी त्याच्या पुनरागमनाबाबत संकेत दिले आहेत.
रिंकूला संघात स्थान मिळाल्यास ध्रुव ज्युरेल किंवा फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरला बाहेर बसावे लागू शकते. याशिवाय शिवम दुबेलाही संघात स्थान मिळण्याची शक्यता असून, त्याच्या अष्टपैलू खेळामुळे संघाच्या संतुलनात बदल होऊ शकतो.
संभाव्य भारतीय प्लेइंग-11:
- संजू सॅमसन (यष्टीरक्षक)
- अभिषेक शर्मा
- तिलक वर्मा
- सूर्यकुमार यादव (कर्णधार)
- रिंकू सिंग / ध्रुव ज्युरेल
- हार्दिक पंड्या
- शिवम दुबे / वॉशिंग्टन सुंदर
- अक्षर पटेल
- वरुण चक्रवर्ती
- मोहम्मद शमी
- आर्शदीप सिंग
आजचा सामना ठरवणार मालिका विजेता?
भारताचा आज विजय झाल्यास मालिका 3-1 ने त्यांच्या खिशात जाणार आहे. पण इंग्लंड जर सामना जिंकला, तर मालिकेतील अखेरचा सामना निर्णायक ठरेल. त्यामुळे हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकण्याच्या मानसिकतेने दोन्ही संघ मैदानात उतरतील. आता पाहायचं, कोणता संघ आपली रणनीती यशस्वी ठरवतो!