चीनमध्ये झपाट्याने पसरणाऱ्या ह्यूमन मेटानिमोव्हायरसने दहशत निर्माण केली आहे. कोरोनासारखी महामारी पसरू नये, यासाठी जगभरातील देश सतर्क झाले आहेत. या व्हायरसच्या पार्श्वभूमीवर भारत देखील सतर्क झाला आहे. भारताचीही या व्हायरसच्या रुग्णावर नजर आहे. भारत या व्हायरसचा सामना करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. आपल्याला घाबरण्याची गरज नाही. या व्हायससमुळे तेलंगणा सरकारने गाइडलाइन जारी केली आहे. तेलंगणा सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले की, चीनवरून येणाऱ्या ह्यूमन मेटानिमो व्हायरसच्या वृत्तामुळे सतर्क झालो आहोत. तेलंगणा राज्य आणि केंद्र सरकारचं आरोग्य मंत्रालय एकत्र मिळून लक्ष देत आहे.
भारत पूर्णपणे तयार; चीनच्या HMPV व्हायरसमुळे सरकार अलर्ट, गाइडलाइन जारी
