मुंबई, ४ फेब्रुवारी: कुंभमेळा २०२५ (Kumbh Mela 2025)मध्ये वाढलेल्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने ८ विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) – बनारस आणि नागपूर – दानापूर मार्गांवर धावणार असून फेब्रुवारी २०२५ मध्ये प्रवाशांसाठी उपलब्ध असतील.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
मुंबई – बनारस कुंभमेळा(Kumbh Mela 2025) विशेष गाड्या (४ सेवा)
गाडी क्र. 01031:
- सुटण्याची वेळ: ५ आणि ८ फेब्रुवारी – रात्री १२.०५ (LTT)
- पोहोचण्याची वेळ: दुसऱ्या दिवशी सकाळी ६.४५ (बनारस)
गाडी क्र. 01032:
- सुटण्याची वेळ: ६ आणि ९ फेब्रुवारी – सकाळी १०.०० (बनारस)
- पोहोचण्याची वेळ: दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ४.४० (LTT)
ठळक थांबे:
ठाणे, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, जबलपूर, सतना, प्रयागराज छिवकी
डब्यांची रचना:
- वातानुकूलित २-टियर (२)
- वातानुकूलित ३-टियर इकोनॉमी (६)
- शयनयान (६)
- सामान्य (४)
- गार्ड ब्रेक व्हॅन आणि जनरेटर कार
नागपूर – दानापूर कुंभमेळा विशेष गाड्या (४ सेवा)
गाडी क्र. 01201/01202
गाडी क्र. 01201:
- सुटण्याची वेळ: ५ फेब्रुवारी – दुपारी १२.०० (नागपूर)
- पोहोचण्याची वेळ: दुसऱ्या दिवशी सकाळी ११.५० (दानापूर)
गाडी क्र. 01202:
- सुटण्याची वेळ: ६ फेब्रुवारी – दुपारी २.३० (दानापूर)
- पोहोचण्याची वेळ: दुसऱ्या दिवशी सकाळी ११.४० (नागपूर)
गाडी क्र. 01203/01204
गाडी क्र. 01203:
- सुटण्याची वेळ: ८ फेब्रुवारी – दुपारी ३.०० (नागपूर)
- पोहोचण्याची वेळ: दुसऱ्या दिवशी दुपारी १.०० (दानापूर)
गाडी क्र. 01204:
- सुटण्याची वेळ: ९ फेब्रुवारी – दुपारी २.३० (दानापूर)
- पोहोचण्याची वेळ: दुसऱ्या दिवशी सकाळी ११.४० (नागपूर)
ठळक थांबे:
गोंदिया, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज छिवकी, मिर्झापूर, बक्सर, आरा
डब्यांची रचना:
- वातानुकूलित प्रथम श्रेणी (२)
- वातानुकूलित २-टियर (३)
- वातानुकूलित ३-टियर (९)
- शयनयान (४)
- सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे
तिकीट आरक्षण आणि माहिती:
- विशेष शुल्कासह तिकीट सर्व पीआरएस केंद्रे आणि IRCTC वेबसाइट वर उपलब्ध.
- सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे अनारक्षित असतील व तिकीट UTS अॅप वरून काढता येईल.
- प्रवाशांनी अधिक माहितीसाठी Indian Rail Enquiry वेबसाइटला भेट द्यावी किंवा NTES अॅप डाउनलोड करावे.
कुंभमेळ्यासाठी रेल्वेचा खास उपक्रम:
कुंभमेळ्यात जाणाऱ्या यात्रेकरूंना सोयीस्कर प्रवासासाठी मध्य रेल्वेने या विशेष गाड्या सुरू केल्या आहेत. त्यामुळे मुंबई, महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि विदर्भातील भाविकांना कुंभस्नानासाठी अधिक सोयीस्कर आणि आरामदायी सेवा उपलब्ध होणार आहे.
कुंभमेळा २०२५ प्रवासासाठी आपले तिकीट आजच बुक करा!