Nashik Leopard Attack News | Sinnar Gonde Incident | बालिकेचा मृत्यू
नाशिक (सिन्नर): Leopard Attack in Nashik सिन्नर तालुक्यातील गोंदे शिवारात शुक्रवारी (दि. 20 जून) सायंकाळी साडेसहा वाजता घडलेल्या हृदयद्रावक घटनेत 4 वर्षांच्या चिमुरडीवर बिबट्याने झडप मारली. आईच्या डोळ्यांसमोर घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Leopard Attack in Nashik – मृत चिमुकलीचे नाव जान्हवी सुरेश मेंगाळ (वय 4) असे आहे.
मेंगाळ कुटुंबीय काही दिवसांपासून गोंदे-दातली स्त्यालगतच्या वस्तीवर वास्तव्यास असून शरद तांबे यांची शेती वाट्याने करतात. घटनेच्या दिवशी जान्हवी आपल्या आई मीना मेंगाळ यांच्यासोबत अरुण नाठे यांच्या शेतात भुईमूग काढण्याच्या कामात सहभागी होती.
काम आटोपल्यानंतर दोघी घरी निघाल्या असताना ज्वारीच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक झडप मारली. बिबट्याने जान्हवीची मान जबड्यात पकडली. या क्षणी मीना मेंगाळ व अन्य महिलांनी आरडाओरड केली. त्यामुळे बिबट्याने चिमुरडीला सोडले व तो पळून गेला.
जान्हवीला तात्काळ सिन्नरमधील खासगी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र प्रकृती अत्यवस्थ असल्याने तिला उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील ज्योती बाळासाहेब तांबे यांनी पोलीस व वनविभागाला माहिती दिली. वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली असून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात आला आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी हर्षल पारेकर व सहाय्यक वनसंरक्षक प्रशांत खैरनार यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. सध्या वनविभाग बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे.