Maharashtra : मंत्रिमंडळ खातेवाटप जाहीर

Mantrimandal khate watap

Maharashtra राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर आठवडाभर प्रतीक्षेत असलेले खातेवाटप अखेर जाहीर झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखातं, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास व गृहनिर्माण, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ आणि राज्य उत्पादन शुल्क खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

खातेवाटपात काही प्रमुख मंत्र्यांना महत्त्वाची खाती देण्यात आली आहेत. त्यांची यादी खालीलप्रमाणे आहे:

देवेंद्र फडणवीस गृहखातं ,एकनाथ शिंदे
नगरविकास व गृहनिर्माण,अजित पवार
अर्थ आणि राज्य उत्पादन शुल्क,चंद्रशेखर बावनकुळे महसूल ,राधाकृष्ण विखे पाटील
जलसंधारण ,हसन मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण,चंद्रकांत पाटीलउच्च तंत्र शिक्षण,
गिरीश महाजन जलसंपदा,

खातेवाटप उशिरा होण्यामागे महायुतीतील अंतर्गत वाद कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. शिवसेना (शिंदे गट) गृहखात्यासाठी आग्रही होती, परंतु भाजपाने गृहखातं मुख्यमंत्र्यांकडेच ठेवले. यामुळे महायुतीतील तणाव उभा राहिला होता, जो आता काही प्रमाणात संपुष्टात आला आहे.

राज्यमंत्र्यांची यादी

माधुरी मिसाळ ,सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण,आशिष जयस्वाल,अर्थ आणि नियोजन,योगेश कदम,गृहराज्य शहर यावेळी राज्यमंत्र्यांना काही महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी दिली गेली आहे.

हिवाळी अधिवेशनात खातेवाटपाबाबत चर्चा होईल अशी अपेक्षा होती, मात्र ती आता पूर्ण झाली आहे. खातेवाटप जाहीर झाल्यानंतर महायुती सरकारकडून पुढील धोरणांवर लक्ष केंद्रीत होईल, अशी शक्यता आहे.

हे पण वाचा : Mahayuti : महायुती सरकार मजबूत आणि अभेद्य आहे – चंद्रशेखर बावनकुळे