Mahashivratri : महाशिवरात्री 2025: त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगात पंचमुखी मुकुट दर्शन, लाखो भाविकांचा उत्साह

Mahashivratri

नाशिक | 26 फेब्रुवारी 2025

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

Mahashivratri: महाशिवरात्री(Mahashivratri) निमित्त त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग येथे लाखो भक्तांचा महापूर लोटणार आहे. भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या या पवित्र स्थळी पंचमुखी सोन्याचा मुखवटा हे प्रमुख आकर्षण असणार आहे. भाविकांसाठी मंदिराचे विशेष दर्शन वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, वीआयपी दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर ट्रस्टने घेतला आहे.

पंचमुखी मुकुटाची भव्य मिरवणूक

महाशिवरात्रीला (Mahashivratri) त्र्यंबकेश्वर महाराजांचा पंचमुखी सोन्याचा मुखवटा पालखीतून नगर प्रदक्षिणेसाठी नेला जाणार आहे. ही भव्य मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गांनी फिरल्यानंतर कुशावर्त तीर्थावर स्नान विधी पार पडेल आणि नंतर मुखवटा पुन्हा मंदिरात आणला जाईल.

Mahashivratri विशेष दर्शन वेळापत्रक

मंदिर बुधवारी (26 फेब्रुवारी) पहाटे 4 पासून गुरुवारी (27 फेब्रुवारी) रात्री 9 वाजेपर्यंत खुले राहणार आहे. भाविकांना दर्शनासाठी पूर्व दरवाजा दर्शन बारी मार्गे प्रवेश दिला जाणार आहे.

Mahashivratri वीआयपी व गर्भगृह दर्शन बंद

गर्दीच्या अनुषंगाने वीआयपी, प्रोटोकॉल व गर्भगृह दर्शन बंद राहणार आहे. देणगी दर्शनही संपूर्ण दिवस बंद ठेवण्यात आले आहे.

त्र्यंबकेश्वरचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व

त्र्यंबकेश्वर हे केवळ ज्योतिर्लिंग नसून गोदावरी नदीचा उगमस्थळ आहे. येथील शिवलिंग हे इतर ११ ज्योतिर्लिंगांपेक्षा वेगळे असून, यात ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची त्रिमूर्ती विराजमान आहे. येथे होणाऱ्या विविध धार्मिक विधींमध्ये कालसर्प पूजा, त्रिपिंडी श्राद्ध, रुद्राभिषेक, महामृत्युंजय जाप आणि विशेषतः नारायण नागबळी विधी हे वैशिष्ट्यपूर्ण आहेत.

भाविकांसाठी महत्त्वाच्या सूचना

  • गर्दी लक्षात घेता सुरक्षेची विशेष तयारी करण्यात आली आहे.
  • भाविकांनी मंदिर परिसरात स्वच्छता आणि नियमांचे पालन करावे.
  • वाहतुकीसाठी विशेष मार्गदर्शक सूचना लवकरच प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.

महाशिवरात्रीच्या या पवित्र पर्वावर त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या लाखो शिवभक्तांसाठी हा सोहळा एक अद्वितीय आध्यात्मिक अनुभव देणारा ठरणार आहे.