नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश गीते यांनी आज म्हसरूळ येथील मतदान केंद्रावर सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. त्यांच्या पत्नी दिपाली गीते व मुलगी शृंखला गीते यांनीदेखील मतदान केले.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
मतदानानंतर माध्यमांशी बोलताना गणेश गीते म्हणाले, “23 तारखेला जनता परिवर्तन करेल, यावर माझा पूर्ण विश्वास आहे. मतदारसंघातील नागरिक या निवडणुकीत बदल घडवून आणतील.”
दिपाली गीते यांनीही आपल्या प्रतिक्रियेत सांगितले, “गेल्या काही काळात आमच्या कुटुंबाला बराच त्रास सहन करावा लागला. मात्र, याची जाणीव मतदारांना आहे, आणि 23 तारखेला मतदानाच्या माध्यमातून जनता याला योग्य उत्तर देईल.”