नाशिक रोड येथील विभागीय महसूल कार्यालयासमोर महाविकास आघाडी Mahavikas Aghadi, वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी परभणी येथील अॅड. सोमनाथ सुर्यवंशी यांच्या पोलीस कोठडीतील पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता. झाला होता या घटनेचा निषेध केला.
काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. कार्यकर्त्यांनी पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणी तात्काळ चौकशी करून, आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. तसेच, या घटनेची फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी करावी आणि संबंधित पोलीस अधिकार्यांवर कारवाई होवो, अशी मागणी करण्यात आली.
तसेच, पैठण तालुक्यातील साखर कारखान्याच्या विरोधात रंजीत ससाणे आणि इतर पिडीत व्यक्तींवरील अमानुष मारहाणीच्या प्रकरणी आरोपींच्या अटकेची मागणी करण्यात आली. या प्रकरणात मुख्य आरोपींची तात्काळ अटक होऊन योग्य कारवाई व्हावी, असे मागणी यावेळी करण्यात आली.
तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द वापरून त्यांचा अपमान करणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली.
आंदोलनात गजानन नाना शेलार, अशोक सातभाई राजेंद्र पवार, मुन्ना भाई झलारी, अशोक पाटील मोगल अशोक पाळदे मसूद जिलानी सचिन आहेर, समाधान कोठुळे, गणेश मोरे, संतोष गायधनी, नामदेव गोपाळ, शरद कासार, निवृत्ती तोंगरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
He Pan Wacha : Chhagan Bhujbal : छगन भुजबळ मंत्रिमंडळाबाहेर: अंतर्गत वाद की रणनीती?