विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या सूचनेनुसार पुणे पोलिसांकडून निर्जन ठिकाणी गस्त, सीसीटीव्ही आणि तातडीची कारवाई! (Pune police yanchya kadun gasta aani cctvbasvnaar dr. Nilam gorhe)

mahila-atyachar-upay-yojana

पुणे शहर आणि परिसरात महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अधिक सतर्क राहण्याचे निर्देश विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले आहेत. पोलीस आयुक्तालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पोलीस विभागाने या गुन्ह्यांवर तत्काळ कारवाई करण्याचे आवाहन केले. पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमारही यावेळी उपस्थित होते.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, बोपदेव घाट, दिवे घाट, वेताळ टेकडी आणि एनडीए परिसरासारख्या निर्जन ठिकाणी पोलिसांनी गस्त वाढवावी. तसेच, निर्जन पोलिस चौक्यांचे अद्ययावतीकरण, रात्रीच्या वेळी प्रकाशझोत आणि सायरनचा वापर यावरही जोर दिला. महिलांच्या सुरक्षेसाठी या भागांत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची आणि त्यांची नियमित देखरेख करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.

गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळे कक्ष स्थापन करणे गरजेचे आहे, जसे की ज्येष्ठ नागरिक, जात पंचायत निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन आणि मानवी तस्करीविरोधी कक्ष. महिलांच्या सुरक्षेसाठी दक्षता समित्या आणि “बॅड टच, गुड टच” या विषयावर शाळांमध्ये कार्यशाळा घेण्यावरही भर देण्याची आवश्यकता आहे.महिलांवरील अत्याचाराविरोधात पोलिसांनी तातडीने आणि प्रभावी पावले उचलल्याने कायद्यावर लोकांचा विश्वास वाढेल, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply