नाशिकमध्ये सिंहस्थ दौऱ्यादरम्यान वक्तव्य
नाशिक – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नाशिकमध्ये सिंहस्थ दौऱ्याची पाहणी करताना केलेल्या एका वक्तव्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. “मला हलक्यात घेऊ नका… मी काय करू शकतो, हे एकदा दाखवून दिले आहे!” अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी विरोधकांना इशारा दिला.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
ऑपरेशन टायगरवर भाष्य
शिंदे यांनी त्यांच्या ऑपरेशन टायगर संदर्भातही वक्तव्य करताना म्हटले,
“हे ऑपरेशन अडीच वर्षांपूर्वीच झाले आहे. आता होणारी ऑपरेशन्स त्या मानाने छोटी आहेत!”
त्यांच्या या वक्तव्याचा रोख नेमका कुणाकडे होता, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
शिंदेंच्या (Eknath Shinde) “दाढी” टिपण्णीने नवीन चर्चा
त्यांनी यावेळी एका “दाढी दाढी“ या शब्दप्रयोगासह,
“मी ठरवलं तर ते करतोच, मग कितीही अडथळे आले तरी मी त्याचा विचार करत नाही!”
असे सूचक विधान केले. त्यांचा हा अप्रत्यक्ष टोला कुणाला होता, याचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न सुरू आहे.
राजकीय वातावरण तापणार?
शिंदेंच्या या वक्तव्यानंतर विरोधकांकडून काय प्रतिक्रिया येतील आणि राज्याच्या राजकारणावर याचा काय परिणाम होईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.