Dileep shankar : मल्याळम अभिनेता दिलीप शंकर तिरुअनंतपुरम हॉटेलमध्ये मृत अवस्थेत आढळले

दिलीप शंकर हॉटेल खोलीत मृत अवस्थेत आढळले.

मल्याळम अभिनेता दिलीप शंकर Dileep Shankar २९ डिसेंबर रोजी तिरुअनंतपुरम येथील हॉटेलच्या खोलीत मृतावस्थेत आढळले. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

तिरुअनंतपुरम, २९ डिसेंबर: प्रसिद्ध मल्याळम अभिनेता दिलीप शंकर Dileep Shankar आज तिरुअनंतपुरम येथील एका हॉटेलच्या खोलीत मृत अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू आहे. अहवालानुसार, दिलीप चार दिवसांपूर्वी हॉटेलमध्ये चेक-इन झाला होता, मात्र गेल्या दोन दिवसांपासून त्याने खोलीबाहेर पाऊल ठेवले नव्हते.

हॉटेल कर्मचाऱ्यांनी सांगितले की, “दोन दिवसांपासून खोलीतून कोणताही आवाज न आल्याने आणि दुर्गंधी येऊ लागल्याने आम्ही खोली उघडली. तेव्हा त्याचा मृतदेह आढळला. त्यानंतर आम्ही पोलिसांना कळवले.”

पोलिस तपास सुरू

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून, खोलीची तपासणी करण्यासाठी फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले आहे. दिलीपच्या सहकलाकारांनीही त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता, पण प्रतिसाद न मिळाल्याने ते त्याला भेटण्यासाठी हॉटेलमध्ये जाणार होते. त्याचदरम्यान त्याच्या मृत्यूची बातमी समजली.

या घटनेने मल्याळम चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. दिलीपच्या निधनामागील नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.

He Pan Wacha :वणी बसस्थानक परीसरात दोघांची गळफास घेऊन आत्महत्या : मृतात अल्पवयीन मुलगी