नाशिक, अल्पवयीन Minor मुलावर बळजबरीने अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या अण्णा उर्फ सोनू रमेश माळी (वय १८, रा. पाथर्डी शिवार) याला नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवत २० वर्षांची सक्तमजुरी आणि ६० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. न्यायाधीश पी. व्ही. घुले यांच्या अध्यक्षतेखाली या खटल्याचा अंतिम निर्णय बुधवारी (दि. ८) जाहीर करण्यात आला.
न्यायालयाने दंडाच्या रकमेतून २५ हजार रुपये पीडित मुलाच्या Minor कुटुंबीयांना नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले आहेत.
२०२० साली माळी याने नैसर्गिक विधीसाठी अल्पवयीन मुलाला सोबत नेऊन त्याच्यावर अनैसर्गिक शारीरिक अत्याचार केला होता. पीडित मुलाच्या वडिलांनी इंदिरानगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. भादंवि कलम ३७७ आणि पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला.
सरकारी अभियोक्ता दीपशिखा भिडे आणि सुलभा सांगळे यांच्या जोरदार युक्तिवादानंतर न्यायालयाने फिर्यादी, साक्षीदार आणि परिस्थितीजन्य पुराव्यांवरून आरोपीला दोषी ठरवले.
गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक आर. एम. भामरे यांनी सखोलपणे करत सबळ पुरावे गोळा केले. त्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
.