नाशिकरोड : मुंबईहून नाशिकला भेटण्यासाठी आलेल्या व्यक्तीला रिक्षाचालकासह त्याच्या दोन संशयित मित्रांनी मारहाण करत लुटल्याची घटना नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी किरण भालेराव सिसोदे (वय ४५ रा.मुंबई) यांच्या फिर्यादीवरून एमएच १५ जे.ए. ०८३६ या रिक्षाचालकासह त्याच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल काण्यात आला आहे. सिसोदे ३० डिसेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारे सिसोदे हे नाशिकरोड येथे आले असता त्यांनी सदर रिक्षाचालकाला त्यांची बहीण ज्योती पाटील यांच्या घराच्या पत्त्यावर जाण्यासाठी रिक्षा ठरवण्यात आली. दरम्यान, संशयित रिक्षाचालकासमवेत त्याचे दोन साथीदार पाठीमागे बसले होते. सिसोदे यांनी सांगितलेल्या पत्यावर रिक्षा घेऊन न जाता संशयितांनी निर्जनस्थळी थांबवत फिर्यादी सिसोदे यांना रिक्षाच्याखाली उतरवून मारहाण केली. तसेच त्यांच्याकडील कपड्याच्या बेंगीसह विवो कंपनीचा मोबाइल हिसकावून नेला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक सूर्यवंशी तपास करत आहेत.
मुंबईच्या प्रवाशाला रिक्षाचालकाने लुटले
