Rules : मुंबईत ई-बाइक चालकांवर कारवाईचा धडाका: ६७२ बाईक्स जप्त, नियमभंगावर वचक

mumbia e baike rules

Mumbai : मुंबईतील ऑनलाइन डिलिव्हरी कंपन्यांच्या ई-बाइक E-Bike चालकांच्या धोकादायक वर्तणुकीमुळे नागरिक आणि पोलिसांसाठी चिंता वाढली आहे. स्वीगी आणि झोमॅटोप्रमाणे इतर सेवा पुरवठादार कंपन्यांच्या डिलिव्हरी बॉयकडून नियमभंगाच्या Rules तक्रारी वाढल्यामुळे वाहतूक पोलिसांनी कठोर कारवाई सुरू केली आहे.

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, ई-बाइकसाठी E-Bike मोटार वाहन कायदा लागू नसल्यामुळे चालकांच्या नियमभंगात Rules वाढ झाली होती. सिग्नल न पाळणे, हेल्मेट न वापरणे, आणि नो एंट्रीमध्ये वाहन घालणे अशी अनेक तक्रारी पोलिसांकडे पोहोचली होती. या तक्रारींचा गांभीर्याने विचार करून वाहतूक विभागाने १८ ते २९ डिसेंबर दरम्यान विशेष मोहिम राबवली, ज्यात ६७२ ई-बाईक्स जप्त करण्यात आल्या आणि १८० डिलिव्हरी दुचाकी वाहनांवर ई-चलान कारवाई केली.

पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, जेव्हा असे नियमभंग Rules करणारे ई-बाइक चालक दिसतील, तेव्हा मुंबई वाहतूक नियंत्रण शाखेच्या हेल्पलाइनवर त्वरित तक्रार दाखल करा. नागरिकांचा सुरक्षा हक्क सुनिश्चित करण्यासाठी पोलिसांची ही कडक कारवाई महत्त्वपूर्ण ठरली आहे.