Nashik : नाशिक शहर व परिसरात वाहतूक नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी शहर वाहतूक नियंत्रण शाखेने मोठ्या प्रमाणात ई-चालानद्वारे दंडात्मक कारवाई केली. एक लाख ६९ हजार ६२ बेशिस्त वाहनचालकांवर दंड ठोठावण्यात आला. यामधून एकूण ११ कोटी ७२ लाख २४ हजार ३०१ रुपये दंड ठोठावला गेला. मात्र, यातील तब्बल १० कोटी २३ लाख ७६ हजार ४०० रुपये दंड अद्याप थकीत आहे.
‘वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नाशिककरांची Nashik संख्या झपाट्याने वाढली आहे. दीड लाखांपेक्षा जास्त प्रकरणे नोंदवूनही, अनेक वाहनचालक दंड भरत नाहीत. या बेशिस्तपणामुळे वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण येतो आहे.
पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मते, “वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना कोणतीही सूट दिली जाणार नाही. थकित दंड ऑनलाईन किंवा वाहतूक शाखेत भरावा.”
नाशिककरांसाठी आवाहन:
- रस्ते सुरक्षेसाठी वाहतूक नियमांचे पालन करा.
- ई-चालानद्वारे आलेल्या थकित दंडाचा तत्काळ भरणा करा.
- बेशिस्तपणे वाहन चालवणे टाळा व इतरांसाठी आदर्श ठेवा.
वर्ष 2025 साठी नागरिकांनी वाहतूक नियम पाळण्याचा संकल्प करून नाशिक शहराला आदर्श वाहतूक व्यवस्थेचा एक नवीन चेहरा देणे गरजेचे आहे.