नाशिक- मा. पंतप्रधान भारतरत्न, श्रध्देय अटल बिहारी वाजपेयी यांची 100 वी जयंती भारतीय जनता पार्टी BJP वसंतस्मृती कार्यालय येथे शहराध्यक्ष प्रशांत जाधव, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, कामगार मोर्चा प्रदेशाध्यक्ष विजय हारगुडे, सरचिटणीस काशिनाथ शिलेदार, ॲड.श्याम बडोदे, रोहिणी नायडू यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रध्देय अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी यांनी यावेळी सांगितले की भारतरत्न, श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांनी आपले आयुष्य समृद्ध व प्रगत भारताच्या उभारणीसाठी वेचले तसेच त्यांनी त्यांच्या जीवनात असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी घडवले. आज हे कार्यकर्ते व पदाधिकारी देशाच्या व राज्यांच्या महत्त्वपूर्ण पदावर आहेत, त्यांच्या जीवनाचा इतिहास प्रत्येक कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी आदर्श घेण्या जोगा आहेच, त्यांचा पंतप्रधान पदाचा कार्यकाळ हा संसदेत गाजलेला कार्यकाळ होता असे ते म्हणाले. आपल्या भाषणात लक्ष्मण सावजी पुढे म्हणाले की श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिन हा सुशासन दिन म्हणून पाळला जातो याची उपस्थिती त्यांना माहिती दिली. यावेळी अनेक चांगल्या योजना प्रगत भारतासाठी त्यांनी कार्यरत केल्या असल्याचेही सांगण्यात आले. यावेळी उपस्थितांतर्फे श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांतर्फे कविता वाचन करण्यात आले.
यावेळी BJP नाशिक ग्रामीण दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनिल बच्छाव, प्रदेश प्रवक्ते प्रदिप पेशकार, प्रदेश प्रवक्ते गोविंद बोरसे, अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष गणेश कांबळे, गिरीष पालवे, नाशिक महानगर उपाध्यक्ष देवदत्त जोशी, अरुण शेंदुर्णीकर, उध्दव निमसे,शाहिन मिर्झा, युवा मोर्चा अध्यक्ष सागर शेलार, सचिन हांडगे, नंदकुमार देसाई, विपुल मेहेता, प्रदिप पाटील, हेमंत नेहेते, व्यंकटेश मोरे, सुजाता करजगीकर, सोनल दगडे, रोहिणी रकटे, अनिता भामरे, भारती बागुल, सीमा झोले, राजेंद्र कोरडे, बापु डापसे, महेश भामरे, दत्ता शिंदे, शरद कासार, सचिन मोरे , जीवन लासुरे, यशवंत पवार, अशोक जाधव, हेमंत भावसार, भाऊसाहेब कडभाणे, प्रसाद आडके, विकास एखंडे, आकाश देवडिगा, पियुष अमृतकर,योगेश तिडके, गणेश गवळी, अमोल पवार, हेमंत रावले, लक्ष्मण गायकवाड, प्रभाकर कडाळे, प्रसाद जाधव, रमेश काशिद, दिनेश राऊत, प्रकाश दवंगे,दिलीप पिंगळे, सतिष निकम,स्वराज ताजनपुरे, आदित्य केळकर, नंदू नखाडे, हिरामण आडके, सुनिल गायधनी, जयराम भुसारे, अविनाश नेरे, श्रीकृष्ण कुलकर्णी, राहुल कुऱ्हे, सुनिल अडसरे, तुषार वाघमारे, प्रदिप गायधनी, सुभाष श्रीवास्तव, अरुण खंडबहाले, सुनिल माळी, पंडीत कांबळे, अनिल थोरात, धोंडीराम ईप्पर, मुकेश मिश्रा,निलेश जोशी, पांडुरंग सावजी, आरिफ काझी, अहमद काझी, परेश चौधरी आदीसह पदाधिकारी, कार्यकर्ते,उपस्थित होते.
हे पण वाचा: BJP : “नाशिक महानगर भाजपकडून नवनिर्वाचित आमदारांचा सन्मान; बंडखोरांना थारा न देण्याचा ठराव”