पोलीस आयुक्तांना शहरातील कायदा सुव्यवस्थेबाबत निवेदन.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
Nashik – नाशिक शहरातील कायदा व सुव्यवस्था, खुन, दरोडे,बलात्कार, सायबर गुन्हे, वाहतूक कोंडी, चेन ओरबाडणे, अवैध धंदे, भूमाफियांच्या टोळया,स्त्रीया व मुलींची छेडछाड, सोशल मिडिया वरील महिला व मुलींचा विनयभंग, वाहतुक व स्प्रिड ब्रेकर समस्या, कौटुंबिक अत्याचार, अफु,चरस, गांजा, गुटक्याची सर्रास विक्री, अवैध हत्यारे बाळगणे, तडीपार गुंडांचा शहरातील सर्रास वावर या व इतर सर्व विषयांबाबत भाजपा अध्यक्ष, सरचिटणीस, मंडल अध्यक्ष यांनी पोलीस आयुक्त संदिप कर्णीक यांची भेट घेवून शहरातील सर्व 9 मंडलातील समस्यांचे निवेदन सादर केले. याप्रसंगी पोलीस आयुक्तांनी शहरातील सर्व पोलीस उपआयुक्तांना मिटींगला बोलवून सर्व समस्यांची नोंद घ्यायला सांगितले व भाजपाकडून आलेल्या सर्व समस्या तातडीने सोडविण्याच्या सुचना केल्या. शहरातील पंचवटी, तपोवन, नाशिकरोड, जुने नाशिक, मध्य, व्दारका, सातपूर, सिडको, नविन नाशिक या सर्व मंडलाच्या मंडल अध्यक्षांकडून कायदा व सुव्यवस्थेसंबंधीत सुचना व अडचणी एकत्रित करून त्यांबाबत पोलीस आयुक्त, उपायुक्त यांच्याबरोबर सविस्तरपणे बैठक आणि याप्रसंगी भाजपा नाशिक महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव यांनी सर्व समस्या गांभीर्याने घ्याव्या,पोलीसांनी व अधिकाऱ्यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांना सहकार्य करावे, भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी विधायक केलेल्या सुचनांची गांभीर्याने दखल घेवून त्या सोडवाव्यात असे अध्यक्ष प्रशांत जाधव यांनी पोलीस आयुक्त व उपायुक्त यांना सुचना केली.

Nashik : भाजपा पदाधिकारी ॲक्शन मोडवर…
याप्रसंगी पोलीस आयुक्तांनी सर्व निवेदने व सुचनांची दखल घेतली. उपायुक्तांनी सर्व सुचना व निवेदने त्यांच्या स्टेशन डायरीत नोंदविण्यास सांगितले व पुढील आठवडयात पुन्हा बैठक घेवून भाजपाने केलेल्या सुचनांची काय कार्यवाही केली याचा अहवाल द्यावा असे सांगितले. 8 दिवसात पुन्हा भाजपा अध्यक्ष, सरचिटणीस, मंडल अध्यक्ष, पदाधिकारी यांच्याबरोबर बैठक घेणार असून आढावा घेणार असल्याचे पोलीस आयुक्त संदिप कर्णीक यांनी सांगितले. याप्रसंगी भाजपा अध्यक्ष प्रशांत जाधव, सरचिटणीस सुनिल केदार, काशिनाथ शिलेदार, रोहिणी नायडू, ॲड.श्याम बडोदे, मंडल अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी, राम डोबे, सुनिल देसाई, भास्कर घोडेकर, भगवान काकड, रविंद्र पाटील, अविनाश पाटील, ज्ञानेश्वर काकड, सचिन मोरे, अमोल गांगर्डे, राहुल कुलकर्णी आदी उपस्थित होते.