नाशिक: आडगाव परिसरातील अमृतधाम मेरी लिंक रोडवर रविवारी (दि. २) सायंकाळी भीषण अपघात (accident ) झाला. वेगाने जाणारी कार ट्रकला मागून धडकल्याने कारचा चक्काचूर झाला. सुदैवाने एअरबॅग उघडल्यामुळे कारचालकाचा जीव वाचला.
अपघाताचे (Accident)कारण आणि घटनाक्रम
अमृतधामकडून मेरी सिग्नलकडे वेगाने जात असलेली कार (MH15 GF 0423) चालकाचा ताबा सुटल्याने ट्रकवर मागून धडकली. अपघाताची तीव्रता इतकी होती की कारचा समोरील भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
प्रत्यक्षदर्शींची मदत आणि पोलिसांची कारवाई
अपघात (Accident) होताच परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेत कारचालकाला बाहेर काढले. घटनेची माहिती मिळताच म्हसरूळ पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा सुरू केला. प्राथमिक तपासानुसार चालकाला किरकोळ जखमा झाल्या असून, उपचारानंतर त्याला सोडण्यात आले.
सुरक्षिततेच्या उपाययोजना महत्त्वाच्या
हा अपघात वेगावर नियंत्रण न ठेवल्यामुळे घडल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. यामुळे वाहनचालकांनी वेगमर्यादा पाळावी आणि सुरक्षेच्या उपाययोजना कटाक्षाने पाळाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.