Nashik : सिडकोतून मध्यरात्री ६० हजारांचे गोवंश चोरीला; शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण

a group of cows in a barn

Nashik : सिडकोतील गणेश चौकात असलेल्या सोनवणे नगर परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी ६० हजार रुपये किमतीचे गोवंश चोरल्याची घटना उघडकीस आली आहे.

या घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली आहे. फिर्यादी ज्ञानेश्वर सोनवणे यांनी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, यासंदर्भात अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

तपास अधिकारी हवालदार परदेशी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे स्थानिक शेतकरी वर्ग आणि पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

He Pan Wacha : नाशिक मध्ये गोवंश हत्येचा प्रयत्न