Nashik : भुसावळ विभागाच्या रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) इती पांड्ये यांनी घोटी ते मनमाड या मार्गावरील नाशिक रोडसह Nashik Road विविध रेल्वे स्थानकांना भेट देऊन प्रवासी सुविधा, सुरक्षा उपाययोजना आणि स्थानकांवरील पायाभूत सुविधांचा आढावा घेतला.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
या दौऱ्यात इती पांड्ये यांनी देवळाली स्थानकावर रेल्वे मार्ग, स्थानक परिसर आणि बुकिंग ऑफिसची पाहणी केली. नाशिक रोड Nashik Road स्थानकावर त्यांनी बुकिंग ऑफिस, पार्किंग परिसर, प्लॅटफॉर्म आणि विविध यंत्रणांमार्फत सुरू असलेल्या कामांची तपासणी केली. प्रवाशांच्या सुविधा आणि सुरक्षा उपायांचा आढावा घेत असताना, त्यांनी प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर करण्यासाठी कामे जलद गतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
घोटी स्थानकावर त्यांनी प्लॅटफॉर्म, स्थानक परिसर आणि पादचारी पूलाची पाहणी केली. याशिवाय, घोटी ते पाडळी दरम्यानच्या घाट आणि पुलांचीही तपासणी करण्यात आली.
या निरीक्षण दौर्यात संबंधित शाखांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. रेल्वे स्थानकांवरील पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी आणि प्रवाशांना उत्तम सेवा पुरवण्यासाठी रेल्वे विभागाकडून तातडीने पावले उचलली जातील, असे आश्वासन डीआरएम पांड्ये यांनी दिले.
हे पण वाचा : Nashik Road:नाशिकरोड जिल्हा व वरिष्ठ स्तर न्यायालय कार्यान्वित होणार