Nashik : महापालिका क्षेत्रातील उद्याने व जॉगिंग ट्रॅकच्या दुरवस्थेबाबत नागरिक, वृक्षप्रेमी संघटना, ज्येष्ठ नागरिक आणि जॉगर्स यांच्याकडून सातत्याने होणाऱ्या तक्रारींची दखल घेत महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी कडक भूमिका घेतली आहे. उद्यान विभागाच्या दुर्लक्षाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत आयुक्तांनी आठ दिवसांत सुधारणा करण्याचा अल्टिमेटम Ultimatum दिला आहे.
Nashik शहरातील प्रमुख उद्यानांची देखभाल खासगी ठेकेदारांकडे सोपवण्यात आली असली तरी, ठेकेदारांच्या कामावर कोणतेही नियंत्रण नाही. खेळणी तुटलेली, पाथवे खराब झालेले, शोभेची झाडे व लॉन्स सुकलेली, तसेच झाडांची छाटणी न झाल्याने उद्याने बकाल स्वरूपात दिसत आहेत.
Nashik NMC आयुक्त खत्री यांनी स्पष्ट केले की, ठेकेदार व उद्यान विभागाचे निरीक्षक आणि अधीक्षक यांच्या हलगर्जीपणामुळेच ही स्थिती निर्माण झाली आहे.
लाईट व्यवस्थापन Ultimatum : उद्यानांमधील शोभेच्या लाईट्स अनेक ठिकाणी बंद अवस्थेत आहेत. दुरुस्तीच्या अभावी नागरिकांना अंधारात व्यायाम करावा लागतो.
सुरक्षेचा अभाव: वॉचमनची नियुक्ती नसल्यामुळे उद्यानांमध्ये नासधूस व चोऱ्या होत आहेत. झाडांच्या संरक्षक जाळ्या तुटलेल्या, चोरीला गेलेल्या आहेत, तसेच संरक्षक भिंती देखील खराब अवस्थेत आहेत.
आयुक्तांनी ठाम भूमिका घेत, उद्यान विभागाला निर्देश दिले आहेत. दर्शनी बोर्ड:
प्रत्येक उद्यान व जॉगिंग ट्रॅकवर निरीक्षक व अधीक्षकांचे नाव व संपर्क क्रमांक असलेले बोर्ड आठ दिवसांत लावावेत,साप्ताहिक अहवाल: प्रत्येक विभाग प्रमुखांनी उद्यान व्यवस्थेचा साप्ताहिक अहवाल अतिरिक्त आयुक्तांकडे सादर करणे बंधनकारक केले आहे,नियमित पाहणी: उद्यान निरीक्षक व अधीक्षकांनी त्यांच्या जबाबदारीतील उद्यानांना नियमित भेट देऊन सुधारणा करावी.
आयुक्तांच्या या आक्रमक भूमिकेमुळे फक्त उद्यान विभागच नव्हे तर इतर विभागांनाही काम सुधारण्याचा इशारा मिळाला आहे. यामुळे शहरातील उद्याने आणि जॉगिंग ट्रॅक पुन्हा नवी झळाळी मिळवतील, अशी नागरिकांना आशा आहे.