Latest News : नाशिकः नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात भोंगळ कारभार समोर आला आहे. रविवारी रात्री कृती पवार नामक महिलेला बाळंतपणासाठी दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तिच्या कुटुंबाला मुलगा जन्माला आल्याचे सांगितल्याने परिवाराने आनंद साजरा केला. मात्र, काल रात्री डिस्चार्ज घेताना महिलेला मुलगा नव्हे, तर मुलगी देण्यात आली, असा आरोप परिवाराने केला आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
या घटनेमुळे जिल्हा रुग्णालयात खळबळ उडाली असून, परिवाराने डॉक्टरांशी वाद घातला आहे. यावर प्रहार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनीही आक्रमक पवित्रा घेत रुग्णालयाला धारेवर धरले आहे. अदला-बदलीच्या आरोपांची सत्यता तपासण्यासाठी चौकशीची मागणी करण्यात आली आहे.