Nashik : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी राजेंद्र वाघ यांनी मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये नाशिक Nashik ग्रामीण जिल्हा (पोलीस उपायुक्त नाशिक शहर यांची हद्द वगळून) कार्यक्षेत्रात 19 डिसेंबर 2024 रोजी मध्यरात्रीपासून ते 1 जानेवारी 2025 रोजी रात्री 24.00 वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे.
सदरचे आदेश लग्नकार्य, मिरवणुका, तालुका आठवडे बाजार किंवा प्रेतयात्रेच्या जमावास लागू राहणार नाहीत. तसेच हा आदेश पोलीस अधिकारी, कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना तसेच सभा अगर मिरवणुका काढण्यास रितसर परवानगी घेतली असलेल्या व्यक्तींना लागू नाही असे आदेशात नमूद केले आहे.
He Pan Wacha : Nashik : भाजपा पदाधिकारी ॲक्शन मोडवर…